फडणवीस-ठाकरे पुन्हा भिडणार? शाखा पाडल्याच्या राड्यावरुन दोन्ही नेते आमने-सामने
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुंबईमध्ये ठाकरे गटाची अनधिकृत शाखा मुंबई महापालिकेने पाडली होती. मात्र ही शाखा पाडल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. यामुळे अधिकारी वर्गात भितीचे वातावरण होते. यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे. कोणी कायदा हातात घेतला असेल तर कारवाई करु, असे फडणवीस यांनी सांगितले.
यासंदर्भात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले की अशा कार्यकर्त्यांवर नक्कीच कारवाई होईल. कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्यांच्यावर कारवाई करुच, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दबदबा ठेवणारे सूरज चव्हाण कोण ?
ठाण्यात ठाकरे गटाच्या नगरसेवकाला मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यामागे शिंदे गट असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोणाच्याही घरावर हल्ला झाला असेल तर त्याची काळजी घेतली जाईल. चौकशी केली जाईल. पण अलिकडच्या काळात काही झालं की एकनाथ शिंदेंच नाव घ्यायचं अशी सवय लागली आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
संभाजीराजेंच्या हत्येचं कारस्थान हिंदुंनीच रचलं, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ…
दरम्यान, 22 जूनला ठाकरे गटाच्या मुंबईतील वांद्रे पूर्वमधील अनधिकृत कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली होती. या भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं. परवानगीशिवाय तेथे बोर्ड लावण्यात आले होते. कार्यालया तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे कारवाई करण्यात आली होती, असे बीएमसीकडून सांगण्यात आले होते.