Devendra Fadanvis : मला जेलमध्ये टाकण्याच्या मविआचा डाव

मुंबई ः मुंबई महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर खोट्या केसेस टाकून मला जेलमध्ये टाकण्याचा डाव मविआचा होता. त्यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे तुम्ही पोलीस दलात कोणालाही विचारा, सगळे सांगतील, असा खळबळजनक दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘माझं व्हिजन… माझा महाराष्ट्र’ या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला. उद्धव […]

Devendra Fadnavis : 'मी मुर्खांना उत्तरं देत नाही'; राऊतांच्या 'त्या' दाव्यावर फडणवीसांचा संताप

Devendra Fadnavis : 'मी मुर्खांना उत्तरं देत नाही'; राऊतांच्या 'त्या' दाव्यावर फडणवीसांचा संताप

मुंबई ः मुंबई महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर खोट्या केसेस टाकून मला जेलमध्ये टाकण्याचा डाव मविआचा होता. त्यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे तुम्ही पोलीस दलात कोणालाही विचारा, सगळे सांगतील, असा खळबळजनक दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘माझं व्हिजन… माझा महाराष्ट्र’ या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेले हाते, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार बजेटच्याच आधी होणार असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच, राज्यपाल भगतसिंह काेश्यारींच्या पदमुक्तीसंदर्भात बोलताना ते माझ्याशी खासगीत बोलताना अनेकदा मला पदमुक्त करा, असे म्हणाल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version