Download App

मतांच्या राजकारणापेक्षा घटनेची योग्य माहिती घ्या; पुणे अपघात प्रकरणी फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावलं

Devendra Fadanvis पुण्यातील कल्याणीनगरच्या अपघातावर राहुल गांधी यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला. त्यावर फडणवीस यांनी राहुल यांना सुनावलं आहे.

Devendra Fadanvis Criticize Rahul Gandhi on Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने तरुण-तरुणीला कारने चिरडल्याची (Pune Accident) घटना घडली. त्यावरुन राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी मोदी सरकारला चांगलच धारेवर धरलंय. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी राहुल यांना सुनावलं आहे.

Akshay Kumar : खिलाडी कुमारला मोठा झटका; ‘या’ दोन सुपरस्टार्सनी सोडला चित्रपट; मोठं कारण समोर

पुणे अपघात प्रकरणी राहुल गांधींनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर बोलताना फडणवीस म्हणाले की, पुण्याच्या घटनेत पोलिसांनी योग्य कारवाई केली. मात्र न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे मुलाला जामीन मिळाला. त्यावर आम्ही देखील आश्चर्च व्यक्त केले आहे. तसेच हे प्रकरण पुन्हा अपील करून पोलिसांनी ही बाल हक्क न्यायालया समोर आणलं आहे. मात्र अशा प्रकारच्या घटनांचं केवळ राजकारणासाठी वापर करणं हे राहुल गांधी यांना शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं योग्य नाही. त्यांनी या घटनेची नीट माहिती घेतली असती. तर त्यांनी अशा प्रकारचा व्हिडिओ ट्विट केला नसता. असं म्हणत फडणवीसांनी राहुल यांना चांगलच सुनावलं आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी म्हणाले होते की, देशातील ट्रकचालक, बसचालक, ओला, उबर, रिक्षाचालकांनी कोणाला ठार मारलं तर त्यांना 10 वर्षांची शिक्षा होते, पण श्रीमंत घरातल्या अल्पवयीन मुलगा दारु पिऊन गाडी चालवत असेल आणि दोन जणांचा जीव घेत असेल तर त्याला निबंध लिहिण्यास सांगत आहेत. तर मग ट्रकचालक, रिक्षाचालकांकडून निबंध का लिहून घेत नाहीत? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.

जय-पराजयाचं अंतर 10 हजारांच्या आत; ‘या’ मतदारसंघांत INDIA-NDA ची वाढणार ‘धाकधूक’

तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलं, दोन हिंदुस्तान बनले आहेत, एक करोडपतींचा आणि एक गरीबांचा , त्यावर ते म्हणतात म्हणतात मी सर्वांनाच गरीब बनवू का? पण हा प्रश्न न्यायाचा आहे. गरीब आणि श्रीमंत दोघांनाही न्याय मिळाला हवा, न्याय हा सर्वांसाठी एकसारखाच असला पाहिजे, त्यासाठीच आम्ही अन्यायाविरोधात लढत असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं.

follow us