Devendra Fadnavis : ‘ते स्वत:चे घर सांभाळू शकत नाही’, फडणवीसांची नाव न घेता अजित पवारांवर टीका

पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad )  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात भाजप ( BJP )  व राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येते आहे. या निवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विठ्ठल उर्फ नाना काटे हे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (24)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (24)

पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad )  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात भाजप ( BJP )  व राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येते आहे. या निवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विठ्ठल उर्फ नाना काटे हे मैदानात आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे असलेले राहुल कलाटे यांनी या निवडणुकीत अपक्ष अर्ज भरला आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis )  यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. जगताप यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत ते जगतापांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवारांवर नाव न घेता टीका केली. ते स्वत:चे घर सांभाळू शकत नाही, तर आमच्या अंगावर आरोप कशाला करता, अशी टीका त्यांनी केली आहे. या ठिकाणी लक्ष्मणभाऊ जगताप यांचे काम एवढे मोठे आहे की, त्यामुळे आमचाच उमेदवार निवडूण येणार आहे. यामुळे त्यांनी त्यांच्या चुकीचे खापर आमच्यावर फोडू नये, अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

दरम्यान अजित पवार व  महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राहुल कलाटे यांना अपक्ष उमेदवारी भरण्यासाठी भाजपने फुस लावल्याचा आरोप केला आहे. त्यावर फडणवीसांनी ही टीका केली आहे. तसेच मनसे हा हिंदूत्ववादी पक्ष झाला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

Exit mobile version