Devendra Fadanvis on New Responsibility to Daughter Divijas entry in Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना राज्यासह देशातील राजकारणावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी चाणाक्षपणे उत्तर दिली. त्यामध्ये त्यांना फडणवीस दिल्लीमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर तसेच त्यांच्या मुलीच्या राजकारणातील प्रवेशावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी थेट उत्तरं दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू आहेत की, लवकरच देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये नवी जबाबदारी मिळणार आहे. त्यामुळे ते राज्याच्या राजकारणातून बाहेर पडतील. त्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जो पर्यंत पक्ष म्हणेल की, राज्यात काम करा तोपर्यंत राज्यामध्ये काम करेल. जेव्हा सांगितलं जाईल की, दिल्लीत जा. त्या दिवशी दिल्लीमध्ये जाईल. तसेच जेव्हा सांगितलं जाईल की, दोन्हीकडे काम करू नका तेव्हा घरी जाईल. कारण भाजपमध्ये अशीच कार्यपद्धती असते. असं म्हणत त्यांनी त्यांच्या दिल्लीमध्ये जाण्यावर उत्तर दिलं आहे.
शत्रूंचं टेन्शन वाढणार! ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची रेल्वेवरून यशस्वी चाचणी
तसेच ते पुढे म्हणाले की, राजकारणात महत्त्वकांक्षेला काहीही अर्थ नसतो. येथे पक्ष आणि जनता तुमची राजकारणातील दिशा ठरवते. त्यामुळे मी देखील मंत्री होईल असं देखील मला वाटलं नव्हतं. असं म्हणत फडणवीसांनी त्यांना दिल्लीत आणि पुढे मिळणाऱ्या जबाबदारीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी फडणवीसांना त्यांच्या राजकीय वारसदाराबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील ते शेवटचे व्यक्ती असतील जे राजकारणात आले आहेत. त्यावर त्यांच्या मुलीच्या राजकारणात येण्याबद्दल ते म्हणाले की, माझी मुलगी 11 वीला आहे.ती राजकारणात सध्या तरी येणार नाही. कारण तिला वकील म्हणून करीअर करायचे आहे.
लंडन रिटर्न, P.hD अन् UPSC पास रॅन्चोचा पराक्रम; पुण्यात केलं अडीच कोटींचं कांड
पण भविष्यात जरी तिला राजकारणात यायचे असेल तर तिने माझी मुलगी म्हणून त्याचा फायदा घेत राजकारणात येऊ नये. तिने एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे एटूझेड अशी सुरूवात करावी. मी तिला राजकारणात येण्यापासून रोखणार नाही. पण तिने मी तिचे वडिल आहे. याचा फायदा घेऊन कोणतही पद मिळवू नये. तिच्या कामाच्या जोरावर ज्या पदापर्यंत तिला जाता येईल तिथपर्यंत जावं. असं यावेळी फडणवी म्हणाले.