Download App

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? भाजपच्या ट्वीटमुळे राज्यात नवा भूकंप ?

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे संकेत भाजपने दिले आहेत.राज्य भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून तशा आशयाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, असे व्हिडिओचे टायटल आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शेवटी एेवढेच सांगतो मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. याच निर्धाराने, याच भूमिकेत, याच ठिकाणी. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईल, गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, असे फडणवीस यांचे व्हिडिओमध्ये बोल आहेत. फडणवीस हे 2014 ते 2019 मध्ये मुख्यमंत्री होते. त्यावेळी फडणवीस यांनी जनादेश यात्रा काढली होती. त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे.

Nilesh Rane | निलेश राणे यांची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे : LetsUpp Marathi

राज्य भाजपने आताच हा व्हिडिओ ट्टीट करण्यामागे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जाऊ लागले आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे दिल्लीला गेले होते. त्यावेळेस राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत ते काही तरी निर्णय घेण्यासाठी गेले असावे, असे बोलले जात होते. या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.


Kangana Ranaut: भाजपच्या नेत्यावर भडकली कंगना; म्हणाली, ‘महिला केवळ सेक्ससाठी नसतात, तर..’

2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. पण अडीच वर्षानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन भाजपबरोबर आले. अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. सरकार स्थिर असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट असे मजबूत सरकार निर्माण झाले होते. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. त्यांच्या काही सहकार्यांना महत्त्वाचे खातेही मिळाली आहे.

या सरकारचा कालावधी आता एक वर्षाचा उरलेला आहे. त्याच काळात आता राज्यात आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता कमी होती. त्याच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली सरकारचे पाच वर्ष पूर्ण करू. पुढची निवडणूकही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढू, असे सांगितले होते. परंतु आता भाजपचे ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी राजकीय संकेत दिले आहेत. परंतु या संकेतामुळे राज्यातील राजकारण आणखी गुंतागुंतीचे निर्माण झाले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेऊन पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले आहेत. त्यामुळे सरकार कोंडीत सापडले आहेत. यामुळे मुख्यमंत्री बदलली जातील काय असा राजकीय शंका आता उपस्थित केल्या जात आहेत.

Tags

follow us