पुणे : ‘मी नागपूरचा आमदार आहे आणि पुन्हा मी तेथूनच आमदारकी लढणार आहे. आत्ता खासदारकी लढवण्याच्या मानसिकतेत मी नाही. पण पक्षाने सांगितलं तर मी गडचिरोलीतून ही लढेन. सांगायचा उद्देश असा की, पक्षाचा जो आदेश असेल तेथून मी लढेल. पण आत्ता ती परिस्थिती नाही.’ एका वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून पुढचे खासदार हे देवेंद्र फडणवीस असणार का ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर असं उत्तर दिलं आहे.
Kasba By Election : भाजपकडून कसब्यात पैशांचे वाटप; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप…
पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणाले की, ‘पुण्यातील लोकांचं आमच्या पक्षावर प्रेम आहे. माझंही पुण्यावर प्रेम आहे. मला पुणं आवडतं. कारण पुणं केवळ सांस्कृतिक, शैक्षणिकच नाही तर एक व्हायब्रल शहर आहे. या शहरामध्ये एक मॅग्नेट आहे.
त्यामुळे मुंबईच्या खालोखाल आपलं पॉवर हाऊस हे पुणं हा शहर आहे. पुण्यामध्ये आपल्याला सांस्कृतिक, शैक्षणिक, अर्थिक सगळ्या प्रकारची पॉवर मिळते. माझंही पुणे शहरावर प्रेम आहे. पण ते तेवढ्यापुरतचं आहे. मी नागपूरचा आमदार आहे आणि पुन्हा मी तेथूनच आमदारकी लढणार आहे. अशी प्रतिक्रिया एका वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली आहे.