Devendra Fadnavis on Nagpur Court : निवडणूक शपथपत्रामध्ये दोन गुन्ह्याची माहिती लपविल्याप्रकणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर झाले होते. मला एकही आरोप मान्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात सांगितले.
2014 च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याचा आरोप करत अॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करत कोर्टात दावा दाखल केला होता. यानुसार आज देवेंद्र फडणवीस सत्र न्यायालयामध्ये हजर झाले होते.
सत्यपाल मलिकांच्या गंभीर आरोपांनंतरही रान उठवणारं भाजप चिडीचुप्प?
या संदर्भात माहिती देताना फडणवीसांचे वकील उदय डबले म्हणाले की, आज नागपूरच्या सत्र न्यायालयामध्ये 313 अन्वये कारवाई होती. यात अशा प्रकरणांमध्ये साक्षी पुरावे सादर केल्यानंतर संबंधित प्रकरणामधील आरोपींना प्रश्न विचारले जातात, त्या अनुषंगाने आज देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे काही साक्षी पुराव्याच्या तयारीसाठी कोर्टाने 6 मे ही पुढची तारीख दिली आहे.
या संदर्भात उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मला एकही आरोप मान्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात सांगितले. वकील उदय डबले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं न्यायालयाला सांगितले आहे.