Devendra Fadnavis on Dharmaveer Movie : सध्या धर्मवीर – 2 या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, हा चित्रपट चर्चेत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धर्मवीर -2 या चित्रपटाबद्दल बोलताना फडणवीसांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. माझ्या मनात देखील एखादा सिनेमा काढण्याची सुप्त इच्छा असल्याचं फडणवीस यावेळी म्हणालेत.
नेका घडला भ्रष्टाचार त्यांच्याकडून अन् वसुली तुमच्याकडून; जयंत पाटलांनी सांगितला रिंगरोडचा AटूZ काळा बाजार
‘धर्मवीर आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारखा नेता आणि हजारो अनुयायी घडवले. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, ही टॅगलाईन या सिनेमापूर्ती मर्यादित नाही तर एकनाथजी शिंदे आणि आमच्या जीवनाशी निगडित टॅग लाईन आहे. दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद देत असतील अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली.
पण अनेकांचे मुखवटे फाटतील
धर्मवीर 2 सिनेमाच काम सध्या कुठवर आलं ते माहित नाही. पण या चित्रपटात आम्हाला देखील एखादा रोल मिळायला पाहिजे होता. कदाचित आम्हाला धर्मवीर 3 मध्ये रोल मिळेल असं मत व्यक्त करत फडणवीस म्हणाले, मलाही एक सिनेमा काढायचा आहे. परंतु, मी सिनेमा काढला तर अनेकांचे मुखवटे फाटतील असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. त्याचवेळी तुम्ही धर्मवीरच्या पुढील भागांची देखील तयारी सुरू करा, कारण एकनाथ शिंदे अजून 20 वर्षे काही थांबत नाहीत अशा शब्दांतून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे देखील अधोरेखित केलं.
चार गाणी चित्रपटात चहा, जेवण उशीरा मिळते; मनोरमा खेडकरांच्या तक्रारीनंतर कोठडीतील फुटेज कोर्टाने मागितले
“धर्मवीर – २” हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी “धर्मवीर – २” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरबाबत प्रचंड उत्सुकता होती. २०२२ ला “धर्मवीर” चित्रपटाचा पहिला भाग आला जो सुपरहिट झाला.”धर्मवीर – २” चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे , डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश – विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे.