Download App

हर्षवर्धन पाटलांसह इंदापूर तालुक्याचे पालकत्व मी स्वीकारतो; देवेंद्र फडणवीसांचा थेट विधानसभेचा शब्द ?

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis Indapur Speech : तुमच्या आशिर्वादाने मला शक्ती मिळाली आहे, त्या शक्ताची वापर इंदापुरसाठी आणि हर्षवर्धन पाटलांना शक्ती देण्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही. हर्षवर्धन पाटलांसह (Harshvardhan Patil) इंदापूर तालुक्याचे पालकत्व मी स्वीकारतो, अशा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) इंदापूरकरवासियांना दिला.

Ahmednagar : तळीरामांसाठी बॅड न्यूज! जिल्ह्यात चार दिवस ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

बारामती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज इंदापूरमध्ये सभा झाला. या सभेला संबोधित करतांना फडणवीस म्हणाले की, अनेकजण भाजपात आल्यानं भाजप मजबूत झाला. इंदापूर तालुक्यातील 200 प्रमुख कार्यकर्ते काल आणि परवा माझ्याकडे आले. मी सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर आज तुम्हाला सांगतो की, हर्षवर्धन पाटील हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ते माझ्या आधी आमदार आणि मंत्री झालेत. हर्षवर्धन पाटील हे सर्व पक्षातील समजून घेणारी व्यक्ती म्हणून ओळखेले जातात. विरोधकांनाही ते आपले हक्काचे व्यासपीठ वाटतात. त्यमुळं मी केवळ इंदापूरचचं नाही, तर हर्षवर्धन पाटलासांह इंदापूर तालुक्याचे पालकत्व स्विकारतो, असं फडणवीस म्हणाले.

लोअर परेलमध्ये प्रथमच ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रौत्सव; शेलार दाम्पत्याचा पुढाकार 

आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने जी शक्ती मला मिळाली, त्या शक्तीचा वापर या तालुक्यासाठी आणि हर्षवर्धन पाटलांना ताकद देण्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

अनेकांना वाटतं की, बारामतीची लढत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील आहे. मात्र, ही लढत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातीलही नाही. ही लढाई नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील आहे, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसांना उद्धव ठाकरेंवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, 2019 साली जनतेने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण बहुतम दिलं होतं. पण, महायुतीला पूर्ण बहुमत असतांनाही जे पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले, त्यांनी जनेतेची फसवणूक केली आणि एक झाले. जनमत डावलून त्यांनी महाविकास आघीडीचं नवं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे हे महायुतीचा घटक होते, पण ते केवळ खुर्चीसाठी पवारांसोबत गेल्याची टीका फडणवीसांनी केलं.

follow us

वेब स्टोरीज