Download App

अनिल देशमुख, सुनील केदारांच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग लावण्यासाठी फडणवीसांच्या हालचाली

Devendra Fadnavis on mission to break Anil Deshmukh, Sunil Kedar stronghold : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka assembly elections) काँग्रेस (Congress) पक्षाने बाजी मारली आहे. एकूण २२४ मतदारसंघ असलेल्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने एकहाती सत्ता राखत भाजपला (BJP) विजयापासून वंचित ठेवलं. मतदारांनी भाजपला सपशेल नाकारलं. त्यामुळं आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजप पराभूत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आतापासून भाजपने आपली रणनीती आखायला सुरूवात केली. त्याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गडांना सुरूंग लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

राज्यात भाजपच्या जागा वाढवायच्या असतील तर आधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या गडांना सुरुंग लावावा लागेल, याचा फडणवीस यांना चांगलाच अभ्यास आहे. कदाचित म्हणूनच देशमुखांच्या काटोल मतदारसंघाच्या तर केदार यांच्या सावनेर मतदारसंघाच्या मोहिमेवर फडणवीस स्वतः निघाले आहेत. फडणवीस यांनी काल या दोन्ही मतदारसंघात शासकीय आढावा बैठका घेतल्या. इतकचं नाहीत, तर या दोन्ही ठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये परिवर्तनासाठी उर्जा निर्माण करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर शहर व जिल्ह्यात तब्बल १२ पैकी ११ जागा एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. फक्त सावनेरची ही एकमेव जागा काँग्रेसकडे राखण्यात सुनील केदार यांना यश आले होते. तर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत BJP च्या जागा घटल्या. ग्रामीणमध्ये सावनेर, काटोल व उमरेड, तर शहरात उत्तर नागपूर व पश्चिम नागपूर अशा पाच जागा जिंकण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आलं होतं. दरम्यान, आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्तेत यायचे असेल, तर काँग्रेस राष्ट्रवादीचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात भाजपला चांगले दिवस आणण्यासाठी फडणवीस हे नागपूर जिल्ह्याच्या मोहिमेवर निघाले आहेत.

Karnataka Government : आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री घेणार शपथ, बंगळुरूमध्ये पार पडणार शपथविधी सोहळा

काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे तुरुंगात जावे लागलं होतं. मात्र, तुरुंगातून बाहेर पडताच देशमुख यांनी आता आपण ताकदीने राज्यभर फिरणार असे सांगत फडणवीस यांच्यावर नेम साधला होता, तर सावनेरचे प्रतिनिधित्व करणारे सुनील
केदार हेदेखील फडणवीस यांच्यावर नेम साधण्याची एकही संधी सोड नाही.

गेल्या निवडणुकीत फडणवीस यांनी सावनेर मतदारसंघात जाऊन भाजपसाठी सभा घेतली होती. पण, केदारांनी त्या सभेचे योग्यरीत्या भांडवल केले. देशमुख – केदार यांचे प्रस्थ मोडीत काढल्याशिवाय जिल्ह्यात भाजपची पकड मजबूत होऊ शकत नाही, हे फडणवीस यांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच फडणवीस यांनी या दोन मतदारसंघांवर विशेष फोकस केला आहे.

काटोल, सावनेर मतदार संघात BJP ला चेहरा नाही
काटोल व सावनेर या दोन मतदारसंघात कॉंग्रेसच्या अनिल देशमुख आणि सुनील केदार या तगड्या नेत्यांना तगडी टक्कर देणारा BJP चा उमेदवार कोण असेल, हे अजून स्पष्ट झालेले नाही. नेतृत्व आणि दिशा नसल्यामुळे भाजप कार्यकर्ते विखुरलेले आहेत. देशमुख, केदारांशी दोन हात करून कोण पंगा घेणार, आपल्याला थोडीच आमदारकीला उभं राहायचं, अशा मानसिकतेत काही कार्यकर्ते आहेत. दरम्यान, हे असेच सुरु राहिले, तर हे दोन्ही मतदारसंघांच भाजपचं वर्चस्व निर्माण करणं, कठीण आहे. त्यामुळेच या दोन्ही मतदारसंघात पक्ष व नेते ताकदीने सोबत आहेत, या लढ्याचं नेतृत्व आपण स्वीकारू, असा संदेश देण्यासाठी फडणवीस या मतदारसंघात दाखल झाले आहेत.

Tags

follow us