शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत येणार का ? देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीत मोठे विधान

Devendra Fadnavis : कुठलाही नवीन पक्ष आत्ता एनडीएमध्ये येण्याची आमची चर्चा नाही. आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही.

Devendra Fadanvis On Ncp

Devendra Fadanvis On Ncp

Devendra Fadnavis on Sharad Pawar NCP BJP Alliance: शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ही एनडीए, महायुतीमध्ये जाणार असल्याची राजकीय चर्चा दिवसभर सुरू होती. या चर्चेला कारण ठरली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे ( Vinod Tawade) यांची मुंबईतील बैठक. या बैठकीमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही शक्यता फेटाळून लावल्या. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत यावर मोठे भाष्य केले आहे.


जयंत पाटील आणि विनोद तावडेंची बैठक कुठे झाली ? मला माहिती नाही; सुप्रिया सुळेंची थेट प्रतिक्रिया

महाराष्ट्रातून एनडीए किंवा महायुतीत कुठलाही पक्ष येणार नाही, असे विधान फडणवीस यांनी करत शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए येणार या राजकीय चर्चेची हवाच काढली आहे. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आत्ता एनडीएमध्ये येण्याची आमची चर्चा नाही. आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. शरद पवारांच्या पक्षात जे कोणी आमदार आणि खासदार आहेत त्यांना कोणालाहा फोडण्याचा आमचा प्रयत्न नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

माझ्याविरोधात कोणताही आधार नसलेले वैयक्तिक आरोप; राम मंदिर चोरीप्रकरणी चंपत राय यांचे रामभक्तांना जाहीर पत्र

राजकीय नाही पण दहा टीएमसी पाणी देण्याची गोड बातमी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नर्मदा नदी खोऱ्यातील प्रकल्पांसंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हजर होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राज्यातील राजकीय चर्चेवर थेटपणे भाष्य केले आहेत. या बैठकीत महाराष्ट्राला दहा टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची आनंदाची बातमी फडणवीस यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळेंनी एनडीएमध्ये जाण्याचे फेटाळले
जयंतराव पाटील आणि विनोद तावडे यांची बैठक कुठे झाली ? मला माहिती नाही, असे थेट उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले. मी आणि विनोद तावडेही भेटतो. आम्ही एनडीए, महायुतीमध्ये येण्याबाबतच्या बातम्या सुरू आहेत. याची मला गमंत वाटत आहे. मी आणि विनोद तावडे अनेकदा भेटलो आहेत. आम्ही एका पार्लमेंट्री कमिटीमध्ये आहोत. गेल्या आठवड्यात दोन वेळा या कमिटीच्या बैठका झाल्या आहेत. विनोद तावडे, अनुराग ठाकूर, काँग्रेसचे लोक बैठकीला असतात, असे सुळे म्हणाल्या.

Exit mobile version