Download App

Video : तुम्ही नैतिकतेवर बोलूच नका, फडणवीसांनी ठाकरेंना फटकारले

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला. यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा लोकसभा अध्यक्ष घेतील असे नमूद करण्यात आले. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही भाजपसोबत निवडणूक लढवली व सत्तेसाठी तुम्ही काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत गेला. यामुळे तुम्हाला नैतिकतेवर बोलण्याचा अधिकारच नाही अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कोर्टाच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ठाकरेंनी नैतिकतेवर बोलू नाही तुम्हाला त्याचा अधिकार देखील नाही अशा शब्दात फडणवीसांना ठाकरेंवर निशाणा साधला.

तुमच्या बाजूनं निर्णय दिल्यास संस्था चांगल्या अन्… मुख्यमंत्री शिंदेंनी फटकारलं

नेमकं काय म्हणाले फडणवीस?
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद एरवी मी बघत नाही. पण आज शेवटचं थोडं मला बघायला मिळालं. ते म्हणाले की नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. माझा त्यांना सवाल आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत बसलात तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करून ठेवली होती? नैतिकतेबद्दल त्यांनी बोलू नये. त्यांनी खुर्चीसाठी विचार सोडला. एकनाथ शिंदेंनी विचारासाठी खुर्ची सोडली. उद्धवजी, तुमच्या लक्षात आलं होतं की तुमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे त्या लाजेपोटी आणि भीतीपोटी तुम्ही राजीनामा दिलात. त्यामुळे विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलाचा चढवण्याचा प्रयत्न करू नका अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरेंना फटकारले आहे.

तसेच पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आजचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला आहे. आजचा निकालमधील काही महत्वाच्या मुद्दयांवर मी आपलं लक्ष वेधतो. सरकार कोसळेल असे वक्तव्य करणाऱ्या महाविकास आघाडीच्या मनसुम्ब्यांवर पाणी फिरलं. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असं कोर्टाने स्पष्ट सांगितलं. तसेच आमदारांच्या अपात्रतेचाअधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे.

घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलं; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अपात्रतेचा निर्णयाचा पूर्ण अधिकार हा केवळ विधानसभा अध्यक्षांना आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे देखील कोर्टाने नमूद केले आहे. ज्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले ते चुकीचे आहे हे कोर्टाच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले आहे.

सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी पुन्हा काढली अजित पवारांची खोडी

सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाला आहे. आता हे सरकार पूर्ण पणे कायदेशीर आहे. म्हणजे यापूर्वीही हे सरकार कायदेशीरचे होते. मात्र काही लोकांना संशय होता की हे सरकार बेकायदेशीर आहे मात्र आता कोर्टाच्या निर्णयानंतर हे विरोधकांच्या शंकेचे निरसन झाले आहे. यामुळे त्यांच्या प्रश्नांना आता खुद्द कोर्टाने उत्तर दिले आहे.

Tags

follow us