ज्या विचाराने बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मरू दिला जाणार नाही, Devendra Fadnavis यांच्याकडून आदरांजली

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. याच निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ ट्विट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. या व्हिडिओमध्ये ज्या विचाराने बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मरू दिला जाणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस […]

_LetsUpp (1)

devendra fadnavis balasaheb thackeray_LetsUpp

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय नेते आठवणी सांगून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत आहेत. याच निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ ट्विट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

या व्हिडिओमध्ये ज्या विचाराने बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मरू दिला जाणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

 

व्हिडीओ मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणतात की, “बाळासाहेबांशी नातं रक्तानं होत नाही ते विचारांनी करावं लागत, विचारांशी नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. त्यामुळे जो या विचारांशी नातं सांगेल तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल. ज्या विचाराने बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तो विचार मरू दिला जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच मार्गदर्शन आम्हाला कायम लाभत राहो.” असं त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version