पक्षातील लोकं का गेली हे पवार साहेबांना चांगलंच ठाऊक; फडणवीसांनीही दिलं करेक्ट उत्तर

Devendra Fadnavis : अजित पवार भाजपसोबत गेले त्यावेळपासून या घडामोडींपाठीमागे शरद पवार (Sharad Pawar) आहेत अशा चर्चा सुरू होत्या. मात्र या चर्चांत काहीच तथ्य नसल्याचे खुद्द शरद पवार यांनीच सांगितले होते. अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजपसोबत जाण्यासाठी मी परवानगी दिली नाही. तपास यंत्रणांच्या भीतीमुळेच अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा […]

Deputy Chief Minister Devendra Fadnavis has assured that action will be taken against all the culprits in Talwade tragedy.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis has assured that action will be taken against all the culprits in Talwade tragedy.

Devendra Fadnavis : अजित पवार भाजपसोबत गेले त्यावेळपासून या घडामोडींपाठीमागे शरद पवार (Sharad Pawar) आहेत अशा चर्चा सुरू होत्या. मात्र या चर्चांत काहीच तथ्य नसल्याचे खुद्द शरद पवार यांनीच सांगितले होते. अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजपसोबत जाण्यासाठी मी परवानगी दिली नाही. तपास यंत्रणांच्या भीतीमुळेच अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या याच खुलाशावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवारांच्या या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर फडणवीस म्हणाले,  माझं एवढंच म्हणणं आहे की 2019 ला शरद पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती आणि ते आमच्यासोबत यायला तयार होते. तर मग ते कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्याबरोबर येत होते का? याआधी 2017 मध्ये देखील त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही ते कुठल्या एजन्सीला घाबरून येत होते का?, तेव्हा मला असं वाटतं की पवार साहेबांना हे चांगलं माहित आहे की त्यांच्या पक्षातील लोकं का बाहेर पडले.

Sanjay Raut : फडणवीसांसारखा खोटारडा माणूस मी… राऊतांचा हल्लाबोल

अजितदादांनी तर अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की पवार साहेबांच्या मान्यतेने सर्व आमदारांनी सह्या करून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता हे सगळे लोक गेल्यानंतर त्यांच्यावर आरोप करणं हे अतिशय अयोग्य आहे, असे फडणवीस म्हणाले.

अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री

राज्य सरकारने काल राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर पुणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या आणखी काही आमदारांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Mahavikas Aaghadi : जागा वाटपाचा घोळ 9 नेते सोडविणार; चव्हाण, राऊत, पाटलांच्या खांद्यावर धुरा

काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस आणि त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाच्या दौऱ्यातही अजितदादा (Ajit Pawar) दिसले नाहीत. ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अजित पवार आजारी असल्याचे छगन भुजबळ आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यावर अजितदादांचं हे आजारपण राजकीय असल्याचंही बोललं जात होतं. अखेर त्यांचं हे राजकीय आजारपण पालकमंत्री पदाच्या नियुक्तीनंतर बरं झाल्याचं बोललं जात आहे.

Exit mobile version