Download App

फडणवीसांनी सांगितला ‘द डर्टी पिक्चर’चा किस्सा, एका दमात तीन ‘शो’ पाहिले

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना द डर्टी पिक्चरचा किस्सा सांगितला. यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला. ते म्हणाले की महाराष्ट्र सरकारने डान्सबार (Dancebar Act) विरोधात कायदा केला. आजही कुठं डान्सबार सुरु असल्याच्या बातम्या आल्या तर आपण कारवाई करतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानपरिषदेत सांगत होते. त्यावेळी बाजूचे सदस्य म्हणाले की आमदार एखादा पिक्चर बघायला गेले तरी बातम्या येतात. यावर फडणवीसांनी दिलखुलास दाद दिली. ते म्हणाले कोणता पिक्चर होता तो? बाजूच्या सदस्यांने सांगितले की ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture).

फडणवीस पुढं म्हणाले की ‘द डर्टी पिक्चर’ नावाचा सिनेमा लागला होता. त्यावेळी सभागृह संपल्याने अनेक सदस्य गेले होते. पण त्यावेळी बाहेर पत्रकार असल्याचे समजल्यावर त्या आमदारांनी तीन शो पाहिले. बाहेरच आले नाहीत ते, असे फडणवीसांनी सांगितले. यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला.

“हा शेवट नाही, आमचा लढा सुरुच राहणार” : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मेहबुबा मुफ्तींची नाराज

खडसे आणि फडणवीस यांच्यात खडाजंगी
ते पुढं म्हणाले की नाथाभाऊंनी काही विषय मांडले. नाथाभाऊंच माझ्यावरचं प्रेम सर्वांनाच माहिती आहे. जगप्रसिद्ध प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर जगप्रसिद्ध प्रेम आहे. त्यांच वेगळंय आणि माझं वेगळंय. पण नाथाभाऊ तुम्ही जे काही पत्र देता, ते सर्व पत्र कारवाईसाठी पाठवतो. 52 नाही 54 पत्र द्या. पण तुम्ही पत्र दिले म्हणजे पुरावा नाही. तुम्ही नाव दिलं, फोन नंबर दिला म्हणजे पुरावा? असा पुरावा असतो? काय नाथाभाऊ तुमच्यासारखा सिनियर माणूस?, अशी शाब्दिक फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

कांदा न खाल्ल्याने कोणी मरत नाही; भाजप आमदारांसमोरवरच बच्चू कडू मोदींवर बरसले !

यावर एकनाथ खडसे म्हणाले की तुम्हाला जी लिस्ट दिली आहे. त्यांच्याकडे मी स्वत: यायला तयार आहे. यावर फडणवीस म्हणाले की तुमच्यासोबत पोलीस पाठवू. पण तुम्ही दिलेल्या पत्रांची छाणनी केली. त्यात अर्ध्या ठिकाणी असं लक्षात आलं की तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांची नावे लिहिली आहेत. आता असं कसं चाललं?

Tags

follow us