मेक इंडियात कांदा येत नाही का ? भाजप आमदारांसमोरच बच्चू कडू मोदींवर बरसले !
Maharashtra Assembly Session: नागपूरः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत (Maharashtra Assembly) बोलताना बच्च कडू (>Bachchu Kadu) यांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट सभागृहात टीका केली. यावेळी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य सभागृहात होते. बच्चू कडू हे मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नांवर बोलत होते. कांद्याच्या प्रश्नावर बोलताना कडू यांनी कांदा मेक इन इंडियात येत नाही का ? असा सवाल उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भाजपला फटका? म्हणून होतेय टीका…
बच्चू कडू म्हणाले, मोदी यांनी मेक इन इंडिया, मेड इन इंडियाची घोषणा केली होती. ही घोषणा कांद्याला लागू होत नाही का ? कांद्याला निर्यात बंदी करायची का गरज होती ? शहरातील लोकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लाज नाही वाटत का ? कांदा नाही खाल्ला म्हणून कोणी मरत नाही. निर्यातबंदीबाबत सराकारला माहित होते. त्यामुळे आठशे डॉलर्स निर्यात शुल्क वाढविले होते. एकापाठोपाठ सरकारने निर्णय घेतला आहे. मी पण सत्तेत आहे. पण बापासाठी बेमान व्हावे की पक्षासाठी हा प्रश्न आहे. पक्षासाठी नाही तर शेतकरी बापासाठी बेमान मी होईल, असे कडू म्हणाले. त्याबरोबर मंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव घेऊन कडू यांनी टोला लगावला आहे.
शरद पवार रस्त्यावर उतरल्याने काही फरक पडणार नाही; विखेंची खोचक टीका
खाणाऱ्याचा विचार होतो. जो अडीच इंच नांगर जमिनीत टाकतोय, त्याला सरकार घाबरत नाही. कारण तुम्ही त्यांच्या हातात जातीचे झेंडे दिले आहेत. आज कांदा निर्यात झाला असता तर तीन-चार हजार क्विंटलला भाव मिळाला असता. कापसाला 15 हजार रुपये क्विंटल, सोयाबीनला दहा हजार रुपये भाव दिला तर कशासाठी आरक्षण मागितले जाईल. शेतकऱ्यांचे भले करू शकले नाहीत, म्हणून आरक्षणाची मागणी होत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे आभार माना ते फिरून देतायत…
सोयाबिनचा भाव 2014 मध्ये साडेचार हजार होता. आता तोच आहे. कापसाचा भाव उलट दहा हजारांवरून सहा हजारावर आला आहे. उलट भाव कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आभार माना ते आपल्याला फिरून देत आहे, असा टोलाही बच्चू कडू यांनी सभागृहातील सत्ताधारी सदस्यांना लगावला आहे. लोकांना जाती-पाती अडकून ठेवले आहे. हिरव्या आणि भगवा रंगात लोकांना अडकून ठेवले आहे. तुम्ही फार व्यवस्थित फाळणी केली आहे. त्यांच्या डोक्यात शेतकरी येऊच देत नाही. इतके हुशार झालेत राजकीय लोक, असे टोलेबाजीही कडू यांनी केली.