Download App

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरुन जुंपली, फडणवीसांचा थेट आव्हाडांना इशारा

‘The Kerala Story’ film controversy : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशभरात वाद सुरु आहे. काहींनी चित्रपटावर आक्षेप घेतलाय तर काहींनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटावर भाजपचा (BJP) प्रोपगंडा असल्यांचा अनेकांनी आरोप केला आहे. तामिळनाडू आणि पाश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातली आहे तर भाजप शासित राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे असं वक्तव्य केले आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा थेट इशाराच दिला आहे. ते अमरावती येथे बोलत होते.

Karnataka Election 2023 : आजची रात्र वैऱ्याची; कर्नाटक विधानसभेसाठी उद्या मतदान

देवेंद्र फडणवीस म्हणाले की जितेंद्र आव्हाड जर असं बोलले असतील तर ते अतिशय चुकीचं आहे. अशाप्रकारे बोलणं हे बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचं लांगुलचालन करण्यासाठी ते अशाप्रकारे बोलतात. पण यामुळे इतर समाजात त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे. विशेषत: हिंदू समाजात.. हे जितेंद्र आव्हाडांना कळत नाही. त्याचं वक्तव्य तपासून पाहिलं जाईल, त्यांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

द केरळ स्टोरी चित्रपटातील कथेवर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, द केरळ स्टोरी चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे. धर्मांतर करुन इसिस संघनेत गेलेल्या महिलांचा अधिकृत आकडा तीन आहे, तरीही चित्रपटात हा आकडा 32 हजार इतका दाखवला आहे. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सार्वजनिकरित्या फासावर लटकवलं पाहिजे.

Tags

follow us