Devendra Fadanvis : विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) विजयी झाले. फडणवीस हे या मतदारसंघातून चौथ्यांदा विजयी झालेत.
कोकणात राणे बंधुंची आघाडी; सिंधुदुर्गमध्ये मतदारांचा महायुतीला कौल?
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. देवेंद्र फडणवीस हे सुरूवातीच्या कलापासून आघाडीवर होते. फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. त्यांना तब्बल 41385 इतकी मते मिळाली असून त्यांनी कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा 14 हजार 062 मतांनी पराभव केला. फडणवीसांनी विजय मिळवल्यावर आता भाजप नेते सागर बंगल्यावर जमण्यास सुरुवात झाली आहे.
फडणवीस यांचा विजय होताच यांच्या मातोश्रींनी फोन करुन फडणवीसांचे अभिनंदन केले. तर येतो संध्याकाळी, आता इकडचं सगळ उरकवतो, कळवतो, असं फडणवीस म्हणाले.
श्रीवर्धनमधून मोठी बातमी! आदिती तटकरे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल
महायुती सरकारने राबवलेली लाडकी बहीण योजनेचा या निवडणुकीत महायुतीला चांगलाच फायदा झाल्याचं दिसतं. कारण, आतापर्यंत महायुती तब्बल 220 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 127 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे गट 57 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 36 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्रिपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला.
फडणवीसांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे दावे करत गुगली टाकली होती, परंतु भाजपला आघाडी मिळू लागताच दरेकरांसह अनेकांनी भाजप नेत्यांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी वक्तव्ये केली.
भाजपने विधानसभेच्या 149 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 127 जागांवर त्यांना आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट हा 85 टक्क्यांहून अधिक मानला जात आहे.
महाविकास आघाडीची पिछाडी…
महाविकास आघाडीची पिछाडी झाली असल्याचे सध्या तरी चित्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाची केवळ 19 तर कॉंग्रेसची फक्त 20 जागांवर आघाडी आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तर 19 जागांवर आघाडी मिळवली आहे.