कोकणात राणे बंधु विजयी; सिंधुदुर्गमध्ये मतदारांचा महायुतीला कौल

कोकणात राणे बंधु विजयी; सिंधुदुर्गमध्ये मतदारांचा महायुतीला कौल

Nitesh Rane Nilesh Rane Lead In Sindhudurg : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार (Konkan Assembly Election Result 2024) आहे. महायुतीची सत्ता राज्यात पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला (Nitesh Rane) लागलेली आहे. कोकणात राणे बंधु विजयी विजयी झाले आहेत. कुडळमध्ये निलेश राणे तर कणकवलीत नितेश राणे यांचा विजय झालाय.

Maharashtra Assembly Election : अभिजीत बिचकुलेंना बारामतीकरांनी नाकारले 7 फेरी अखेर फक्त 27 मत

कोकणामध्ये राणे बंधू देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कणकवलीमध्ये नितेश राणा यांना आतापर्यंत 51,944 मतं मिळाली आहेत, तर ठाकरे गटाचे संदेश पारकर यांची पिछाडी होत असल्याचं दिसत आहे. त्यांना आतापर्यंत 21,507 मतं मिळालेली आहेत.

कोपरी पाचपाखडीत एकनाथ शिंदे पुढे, केदार दिघेंना चौथ्या फेरीत किती मतं मिळाली?

कुडाळ मतदारसंघात निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील आघाडी घेतली आहे. आतापर्यंत निलेश राणे यांना 30, 544 मतं मिळालेली आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार वैभव नाईक यांना 26, 987 मतं मिळाली आहेत. विधानसभा निवडणुकीचे कल येण्यास सकाळपासून सुरुवात झालीय. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचे कल समोर आलेत.

यामध्ये दोन्ही राणे बंधुं आघाडीवर असल्याचं चित्र आहे. सावंतवाडी मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे दिपक केसरकर आघाडीवर आहेत. सिंधुदुर्गच्या तिन मतदारसंघात महायुतीच आघाडीवर असल्याचं दिसतंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube