Download App

‘धन शक्ती की जनशक्ती’  कोणाचा विजय होतो ते कळेल – शुभांगी पाटील

  • Written By: Last Updated:

नाशिक :  नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी काँग्रेससोबत बंड करून अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे. त्यांना भाजप पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. याचसाठी भाजपचे गिरीश महाजन हे निवडणुक बिनविरोध होण्यासाठी नाशिकमध्ये रवाना झाले आहेत. अशातच ठाकरे गटाने पाठींबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील आज सकाळपासून गायब झाल्या होत्या.

नाशिकच्या शुभांगी पाटील विभागीय आयुक्त कार्यलयात आपली उमेदवारी दाखल झाल्या आहेत. आपण आपल्या उमेदवारीवर कायम असल्याचे शुभांगी पाटील यांच म्हणणं आहे. मी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेतलाय. येत्या काळात धन शक्ती की जण शक्ती चा विजय होतो ते कळेलच, मी माझ्या उमेदवारीवर कायम, माझ्यावर कोणाचा दबाव नाही. सकाळ पासून नॉट रीचेबल राहण्यामागचे कारण वेळ आल्यावर सांगणार आहे.

महाविकास आघाडी मला पूर्ण विश्वास आहे, उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार सगळ्या पक्ष श्रेष्ठीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. मला उमेदवारी देणार असा शब्द दिला होता. त्यामुळेच भाजपात प्रवेश केला होता. तीन महिन्यांसाठी कोणी जाणार नाही. तुम्ही पक्षात या आम्ही विचार करु, असं सांगितलं होतं, अशी माहिती शुभांगी यांनी यावेळी दिली आहे.

Tags

follow us