Download App

Dhananjay Mahadik : नैतिकता गमावलेल्यांना कोल्हापूर स्विकारणार नाही, महाडिकांचं सतेज पाटलांवर टिकास्त्र

Dhananjay Mahadik On Satej Patil : कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तर याची जोडणी थेट राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीशी केली जात आहे. कारण विनय कोरे यांनी आपल्या भाषणामध्ये नुकतच एक वक्तव्य केलं. सतेज पाटलांनी त्यावेळी शब्द दिला होता. असं ते म्हणाले होते.

यावर आता भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाडिक म्हणाले की, कोरे यांनी सांगितलं की, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी असं ठरलं होतं की, कोल्हापूर विधानसभेची कॉंग्रेसची जागा कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांना बिनविरोध द्यायची आणि त्यांनी देखील कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवायची नाही. असा त्यांनी शब्द त्यांनी दिला होता.

त्यावेळी भाजपचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते चंद्रकांत पाटील, कोरे, सतेज पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यातून हा निर्णय झाला होता. कोरे म्हणाल्याचं असं देखील यावेळी महाडिकांनी सांगितलं. पण आता याविषयावर बोलण्यात काही अर्थ नाही कारण कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चार दिवसांवर येऊन ठेपली आहे.

आमदार जगतापांचं राणेंना ओपन चॅलेंज

आम्ही लोकांनी वारंवार सांगत होतो की, सतेज पाटील हे द्वेषातून राजकारण करतात. सगळ्या सत्ता आणि त्यातील आर्थिक बाबींचा वापर ते स्वार्थासाठी करतात. पण विनय कोरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून स्पष्ट झाल्याचं महाडिक म्हणाले आहेत. तर सतेज पाटलांनी नैतिकता गमावलेली आहे. एनडी पाटलांनी देखील त्यांनी सुर्याजी पिसाळ ही उपमा दिली आहे. तसेच नैतिकता गमावलेल्या नेत्याला कोल्हापूर जिल्हा स्विकारणार नाही. अशी टीका यावेळी भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी कॉंग्रेसच्या सतेज पाटलांवर केली आहे.

Tags

follow us