Download App

Dhananjay Munde : कमळाच्या फुलाने जनतेला एप्रिल फुल बनवलं!

Dhananjay Munde : राज्यात महाविकास आघाडीच्या ‘वज्रमुठी’ला घाबरून भाजप-एकनाथ शिंदे गट यात्रा काढायला लागले आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. त्यामुळे कमळाच्या फुलाने या राज्यातील जनतेला फुल बनवलं आहे. १ एप्रिल हा दिवस भाजपचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करा, अशी सडकून टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली.

महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, काँगेसचे बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर सडकून टीका केली आहे.

Trupti Desai म्हणतात …तर बारामती लोकसभा निवडणूक लढवणार! – Letsupp

भाजपने शेतकऱ्यांचे तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांसाठी मोठया घोषणा केल्या. मात्र, दिले काहीच नाही. महाविकास आघाडीने नुसती वज्रमुठ आवळली काय, अन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची यात्रा निघायला लागली आहे. कमळाच्या फुलाने जनतेला एप्रिल फुल बनवलं आहे. भाजपने राज्यातील जनतेची चेष्टा केली आहे. १ एप्रिल हा दिवस भाजपचा वर्धापन दिन म्हणून साजरा करा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

भाजपला आपल्या विरोधात कोणी काही बोलले तर अजिबात सहन होत नाही. त्यामुळे विरोधकांना त्रास द्यायला लगेच सुरु करतात. सरकारला चोर म्हटले की लगेच घरी पोलीस पाठवतात. विरोधात बोलले की लगेच दबाव टाकतात, अशी टीका देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.

(3) Congress on PM Modi | काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us