Download App

उद्धव ठाकरे, राहुल गांधींची सहमती घेतली का?, CM पदासाठी जयंत पाटलांचे नाव पुढे येताच मुंडेंचा टोला

जयंत पाटलांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपण्यासाठी ठाकरे आणि राहुल गांधींची सहमती विचारली का? असा टोला मुंडेंनी लगावला.

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde : मुख्यमंत्रिपदावरून मविआत (Mahavikas Aghadi) सातत्याने वादाच्या ठिणग्या पडत असल्याचं दिसतं. दरम्यान, शरद पवारांनी काल महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यास जयंत पाटलांकडे (Jayant Patil) महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, असे विधान केले. त्यावरून आता मंत्री धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) जोरदार टोला लगावला.

IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय खोलात? BHR बॅंक घोटाळ्याप्रकरणी CBI कडून गुन्हा! 

धनंजय मुंडेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, जबाबदारी सोपण्याआधी उद्धव ठाकरे, राहुल गांधींना विचारलं पाहिजे. जयंत पाटलांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपण्यासाठी ठाकरे आणि राहुल गांधींची सहमती विचारली का? असा टोला मुंडेंनी लगावला.

महसूलमंत्री विखेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; तासाभराच्या बैठकीत कोणती चर्चा ? 

अजितदादागटाची पहिली यादी कधी येणार?असा सवाल केला असता ते म्हणाले की, सर्वच पक्षामध्ये पहिल्या यादीविषयी सस्पेन्स कायम असतो, 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायची तारीख असल्याने यादी लवकरच जाहीर होईल, असंही मुंडेंनी स्पष्ट केलं.

शरद पवार गटात इनकमिंग वाढली असून अनेक दिग्गज नेते शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. दिपक मानकरही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत विचारले असता मुंडे म्हणाले की, निवडणुका जाहीर होतात तेव्हा आयाराम आणि गयाराम फार होतं. सध्या आमचाच पक्ष टार्गेट होतो, मात्र, आमच्याकडे कोण आलं हे तुम्हाला दिसत नाही, असं परखड मत मुंडेंनी व्यक्त केला. ते म्हणाले, प्रत्येकाची महत्वकांक्षी असते आमदार व्हायची. दिपक मानकर हे नाराज वाटत नाही. कारण, माझे त्यांच्याशी माझे जुने संबंध आहे, जर नाराजी असेल तर पक्ष श्रेष्ठी त्यांच्याशी बोलतील, असं मुंडेम्हणाले.

राजश्री मुंडे यांचा कारचा अपघात झाला. याविषयी बोलताना देवाच्या कृपेने सुदैवाने काही झालेले नाही, असं मुंडे म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?
इस्लापूरमध्ये काल शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेचा समारोप झाला. या सभेत जयंत पाटील बोलण्यासाठी उभे राहिले असता उपस्थितांना त्यांच्या नावाने मुख्यमंत्रीपदाच्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान केलं. जयंत पाटील यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी येण्याचे संकेत त्यांन दिले. महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याची तसेच राज्याला राजकीयदृष्ट्या पुढे नेण्याची मोठी जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर असणार आहे. ते राज्याचा विकास योग्य पद्धतीने करू शकतील याची मला खात्री आहे, असं पवार म्हणाले होते.

follow us