शरद पवारांनी डाव टाकला, विदर्भातील बडा नेता अजितदादांची साथ सोडणार?

शरद पवारांनी डाव टाकला, विदर्भातील बडा नेता अजितदादांची साथ सोडणार?

Rajendra Shingane Will Join Sharad Pawar Group : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत आहेत. अनेक नेते अजितदादांच्या (Ajit Pawar) गटातून घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. त्यात फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकरांचे (Ramraje Naik Nimbalkar) नाव आघाडीवर आहेत. तर मंगळवारी विदर्भातील एका बड्या नेत्याने मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. आमदार राजेंद्र शिंगणेंनी (Rajendra Shingane) पवारांची भेट घेतल्याचं बोलल्या जातंय.

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची मुंबई उच्च न्यायालयात धाव; काय आहे प्रकरण? 

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर एक व्यक्ती सुप्रिया सुळेंच्या गाडीत बसून जातांना आपला चेहरा लपवत असल्याचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कॅमेरात आपला चेहरा दिसू नये म्हणून या व्यक्तीने चेहरा फाईलच्या आड लपवला. या व्यक्तींबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले गेले. त्यात राजेंद्र शिंगणे यांचे नाव आघाडीवर होतं. गेल्या काही दिवसांपासून शिंगणे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती राजेंद्र शिंगणे असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आमदार काळेंनी दिलेला शब्द पाळला; भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित… 

राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले होते, मात्र राजेंद्र शिंगणे पुन्हा एकदा घरवापसी करत तुतारी चिन्हावर आगामी विधानसभआ निवडणूक लडण्याची तयारी करत असल्याचं बोलल्या जात आहे.

अलीकडेच एका कार्यक्रमात शिंगणे यांनी शरद पवार यांचे कौतुक करत नाईलास्तव अजितदादांसोबत गेलो असं विधान केलं होतं. मी 30 वर्षांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे, मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन. मी नाईलास्तव अजितदादांसोबत गेलोय, असं विधान त्यांनी केलं होतं.

दरम्यान, नुकतीच आमदार शिंगणेंनी विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखत दिली असून त्यांनी तुतारी हाती घेतल्यास अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube