आमदार काळेंनी दिलेला शब्द पाळला; भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित…

आमदार काळेंनी दिलेला शब्द पाळला; भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित…

Mla Aashutosh Kale : कोपरगाव मतदारसंघात भगवान वीर एकलव्य यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मागणी अनेक दिवसांपासून आदिवासी बांधवांकडून करण्यात येत होती. पुतळ्यासाठी मी जागा उपलब्ध करुन देणार असा शब्द आमदार आशुतोष काळे (Mla Aashutosh) यांनी दिला होता. अखेर आमदार काळेंनी दिलेला शब्द पाळत भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित केली असून पुतळ्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा विकास आराखडा देण्यात आला असल्याचंही आमदार आशुतोष काळेंनी स्पष्ट केलंय.

Bigg Boss 18: ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! ‘बिग बॉस’च्या घरात सदावर्तेंचे धक्कादायक खुलासे

कोपरगाव मतदारसंघात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारला जावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. पुतळ्याच्या निधीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा केलीयं. यावेळी आशुतोष काळेंनी 1 कोटी रुपयांचा विकास आराखडाच अजितदादांसमोर मांडला आहे. तसेच कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांच्यासोबत चर्चा करुन भगवान वीर एकलव्य यांच्या भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागाही निश्चित करण्यात आलीयं.

पाकिस्तानला धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये असणार हायब्रीड मॉडेल, टीम इंडिया ‘या’ देशात खेळणार सामने

मी दिलेला शब्द पूर्ण करणारा माणूस…
मी दिलेला शब्द पूर्ण करणारा माणूस आहे, खोटी आश्वासने देत नाही आणि देणारही नाही. आदिवासी बांधवांना मी शब्द दिला होता की, मी भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणार. त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करून आज पुतळ्यासाठी कोपरगाव शहरात जागा निश्चित करण्यात आली आहे. तरीदेखील काही व्यक्ती आपला गैरसमज करू शकतात. पण मी माझा दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय राहणार नसल्याचं आमदार काळे यांनी स्पष्ट केलंय. तसेच शासन दरबारी तब्बल एक कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केलेला असून त्याबाबत माझा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. या निधीतून आदिवासी समाज बांधवांना अपेक्षित असलेला भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिलीयं.

Film Awards: हाताला प्लास्टर बांधून दादासाहेब फाळके पुरस्कार घेण्यासाठी पोहोचले मिथुन चक्रवर्ती

आदिवासी समाज पूर्ण ताकदीने आमदार काळेंच्या मागे..

कोपरगाव मतदारसंघात भगवान वीर एकलव्य यांचा पुतळा उभारला जावा ही आदिवासी समाजाची मागील कित्येक वर्षापासूनची मागणी होती, परंतु मागील 70 वर्षाच्या काळात आमच्या समाजाचा विचार झाला नाही. परंतु आमच्या भावनांचा विचार करून आमदार आशुतोष काळे यांनी आमच्या भावना जाणल्या व आमची मागणी पूर्ण करण्यासाठी त्याबाबत तातडीने बैठक घेवून भगवान वीर एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा देखील निश्चित केली आहे. त्यामुळे मतदारसंघातील संपूर्ण आदिवासी समाज आमदार आशुतोष काळेंच्या पाठीशी उभी राहणार असल्याच्या भावना आदिवासी समाज बांधवांनी व्यक्त केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube