Bigg Boss 18: ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! ‘बिग बॉस’च्या घरात सदावर्तेंचे धक्कादायक खुलासे

Bigg Boss 18: ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! ‘बिग बॉस’च्या घरात सदावर्तेंचे धक्कादायक खुलासे

Gunaratna Sadavarte Shocking Revelation Bigg Boss 18: बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व संपल्यानंतर बिग बॉस हिंदीच्या (Bigg Boss 18) नव्या पर्वाला सुरुवात करण्यात आली आहे. बिग बॉस 18 मध्ये वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत असलेले वकील गुणरत्न (Gunaratna Sadavarte) यांनी एन्ट्री घेतल्याने चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. (Shocking Revelation ) पहिल्या दिवसापासून सदावर्ते बिग बॉसच्या घरात सक्रिय झाल्याचं बघायला मिळत आहे. (Maharashtra Politics) घरातील सदस्यांसोबत त्यांच्या हटके स्टाइलने मैत्री करण्यासोबतच ते प्रेक्षकांचंही भरपूर मनोरंजन करत आहेत. सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात नुकतचं महाराष्ट्रातील सत्तापालटाबद्दल धक्कादायक खुलासे केला आहे.


जून 2022 मध्ये CM एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील मविआ सरकार कोसळलं. या सगळ्यामागे मीच असल्याचा धक्कादायक खुलासा सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात केला आहे. सोबतच ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी 6 महिने एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालवल्याचा मोठा गौप्यस्फोटही सदावर्तेंनी केला आहे. “उद्धव ठाकरेंचं मविआ सरकार माझ्यामुळे पडलं. तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. 6 महिने हा संप सुरू होता. त्यामुळे उध्दव ठाकरे -शरद पवार यांच्यावर प्रेशर आलं. त्यामुळे त्यांचं मविआ सरकार पडलं. 6 महिने आम्ही हा संप चालवला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेनेतील काही आमदारही माझ्यामुळेच फुटले होते,” असे धक्कादायक खुलासे सदावर्तेनी केले आहेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी संप केला होता. जवळपास 6 महिने एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू होता. गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हा संप करण्यात आला होता. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच सदावर्तेंची चर्चा रंगली आहे. त्यांचा हटके अंदाज प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत असल्याचं बघायला मिळत आहे.

त्यादिवशी एन्काउंटर निश्चित होता

गुणरत्न सदावर्ते यांचे म्हणणे ऐकून सर्वांचेच कान टवकारले. यावर नायरा बॅनर्जी म्हणते, ‘या सर्व खूप धोकादायक गोष्टी आहेत.’ यानंतर शहजादा धामीने तिला विचारले की, मग तुला बिग बॉसचे भांडण खूप हलके वाटेल? त्याला उत्तर देताना वकिल म्हणतात, ‘हे मला घरोघरी वाटतंय.’ यानंतर ते म्हणतात, शरद पवारांच्या बाबतीत काय झालं ते सांगतो. तो म्हणतो, ‘मला या हल्ल्याचा मास्टरमाईंड बनवण्यात आले. त्यात मला तुरुंगात जावे लागले. एकदा मला जामीन मिळू शकला नाही आणि शेवटी पोलीस मला घ्यायला आले. त्यादिवशी माझा एनकाउंटर निश्चित होता. मात्र त्यातून मी वाचलो, पोलिस अधिकारी माझ्यावर खूप चिडले.

Bigg Boss 18: ‘माझं एन्काउंटर होणार होतं’, बिग बॉसच्या घरात सदावर्तेंचा मोठा दावा

तुरुंगात आरएसएसचा एक माणूस असल्याचे त्याने उघड केले, ज्याने त्याला सांगितले होते की जर तो तुरुंगातून बाहेर आला तर त्याला मारले जाईल. मला 4 वाजेपर्यंत सोडू नका. माझी केस कोर्टात 3 वाजेपर्यंत निकाली निघाली. ते पुढे म्हणाले की, ‘मला सांगण्यात आले होते की, मला कसाबच्या सेलमध्ये हलवण्यात येईल. कसाबनंतर अंडर सेलमध्ये जाणारा मी पहिला माणूस होतो. माझ्या मुलीने मला जामीन मिळाल्याचा अर्ज लिहिला. मी बाहेर आलो तेव्हा एका पोलिसाने मला जीवदान मिळाले नाहीतर खंडाळ्यात तुमचा सामना केला असता असे सांगितले. सरकार बदलले, माझे दिवस बदलले. असा खुलासा त्यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube