भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

Dhananjay Munde Vs Pankaja Munde : बीड म्हंटले की धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांची नाव प्रथम येतात. राजकीय मुद्द्यांवरून अनेकदा या भाव बहिणीचे खटके उडाले आहे. मध्यंतरी मनोमिलन झालेल्या या भाव बहिणीचं नातं पुन्हा एकदा फिस्कटलं आहे. ‘भ्रष्टाचाराच्या संदर्भात कोणी बोलू नये असं मला वाटतं. माझा कारभार सर्वांच्या समोर आहे, असं म्हणत भाजप नेत्या […]

Untitled Design   2023 04 23T121341.217

Untitled Design 2023 04 23T121341.217

Dhananjay Munde Vs Pankaja Munde : बीड म्हंटले की धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांची नाव प्रथम येतात. राजकीय मुद्द्यांवरून अनेकदा या भाव बहिणीचे खटके उडाले आहे. मध्यंतरी मनोमिलन झालेल्या या भाव बहिणीचं नातं पुन्हा एकदा फिस्कटलं आहे. ‘भ्रष्टाचाराच्या संदर्भात कोणी बोलू नये असं मला वाटतं. माझा कारभार सर्वांच्या समोर आहे, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

जवाहर एज्युकेशन सोसायटी निवडणुकीनिमित्त पंकजा मुंडे यांनी प्रचाराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी पंकजा यांना धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘पंकजा मुंडे एक वचनी आहे. मी त्यांच्या विरोधात काहीच बोलले नाही.

पंकजा मुंडे एक वचनी आणि एक बाण असल्यासारखे आहे. एकदा शब्द दिला की फिरत नाही’. ‘मी जर एखादी जाहीरपणे भूमिका मांडली तर त्याच्या मागे गेली नाही. मी काय वैयक्तिक आरोप केले का? मनोमिलनाची माझ्याकडून प्रसारणा नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान पुन्हा एकदा या भावा- बहिणीमध्ये वाद पेटल्याचे चित्र सध्या दिसते आहे.

दरम्यान या कार्यक्रम प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘या निवडणुकीमध्ये मी उभा राहिली आहे. माझ्या समोरचे उभा राहिले आहेत.जे कोणी उभा राहिले आहेत, त्यांच्या प्रचार करणे हे आमचे कर्तव्यच आहे. कॉलेज चालवणं सोपं नाही. त्या ठिकाणी मुलं-मुली येतात. त्यांचा भविष्य आणि सुरक्षितता महत्त्वाचे असते.

‘हे विसरू नका उद्धव ठाकरे तुमचे हेडमास्तर होते; भुजबळांचा गुलाबरावांना टोला

निवडणुकीवरून भाऊ – बहीण आमनेसामने
मुंडे बहिण भाऊ हे जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीवरून आमने-सामने आले आहेत. धनंजय मुंडे यांनी एका सभेत बोलताना पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा साधत पंकजा यांच्यावर गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या या एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीत पॅनल उभा करत पंकजा मुंडे यांना कडवं आव्हान दिलं आहे.

Exit mobile version