‘हे विसरू नका उद्धव ठाकरे तुमचे हेडमास्तर होते; भुजबळांचा गुलाबरावांना टोला

‘हे विसरू नका उद्धव ठाकरे तुमचे हेडमास्तर होते; भुजबळांचा गुलाबरावांना टोला

Chhagan Bhujbal Vs Gulabrao Patil : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावमध्ये सभा घेणार आहे. त्यापूर्वीच शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. आता याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील तुम्ही दगड मारून सभा उधळणार असाल, तर त्या सभेत येणारे लोकं काही कमी नाहीत. जिथून तुम्ही हे शिक्षण घेतले तिथले हेडमास्टरच उद्धव ठाकरे आहेत हे तुम्ही विसरू नका अशा शब्दात भुजबळ यांनी गुलाबराव पाटील यांना शाब्दिक टोला लगावला आहे.

शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. दरम्यान या दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप तसेच टीका टिप्पणी करत असतात. यातच उद्धव ठाकरे आज गुलाबरावांच्या मतदार संघात म्हणजेच जळगावात सभा घेणार आहे. यामुळे आता ठाकरेंची सभा व्यवस्थित पार पडणार नाही यासाठी गुलाबरावांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नेमकं काय म्हणाले होते गुलाबराव?
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या कोणत्याच आंदोलनात संजय राऊत (Sanjay Raut) हे नव्हते, त्यांना शिवसेनेचे आंदोलन कसे होतात हे साधं माहितही नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही दगडे मारून आंदोलन आणि सभा बंद करणारे लोक आहोत असा इशाराही त्यांनी राऊतांना दिला होता.

36 दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात

ठाकरे हे तुमची हेडमास्तर विसरू नका
दगड मारून सभा उधळून लावू इशारा देणाऱ्या गुलबारावांच्या आव्हानाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, तुम्ही दगड मारून सभा उधळणार असाल, तर त्या सभेत येणारे लोकं ( उद्धव ठाकरे ) जिथून तुम्ही हे शिक्षण घेतले तिथले हेडमास्टरच आहे ना, असा टोला भुजबळांनी लगावला.

राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान सुरु; पाटील-महाडिकांची प्रतिष्ठा पणाला

पाटील समर्थक आक्रमक
जळगावात उद्धव ठाकरेंच्या होणाऱ्या सभेपूर्वी राजकीय वातावरण चांगलंच तबल्याचे पाहायला मिळते आहे. काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंच्या सभेत घुसणारच असा पवित्रा गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. जर असे झाले तर त्यांना प्रतिउत्तर देऊ असा इशारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube