36 दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात

Untitled Design   2023 04 23T091520.653

Amritpal Singh Surrender: खलिस्तान समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पंजाब पोलिसांनी फरार अमृतपाल सिंगला मोगा येथून अटक केली आहे. अमृतपाल हा 18 मार्चपासून फरार होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या काकांसह अनेक साथीदारांना अटक केली आहे.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरार अमृतपालला मोगा येथून अटक करण्यात आली आहे. अमृतपाल यांना आसाममधील दिब्रुगड येथे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दिब्रुगडमध्ये त्याची चौकशी करण्यात येणार आहे. अमृतपालला ताब्यात घेतल्याचे चित्रही समोर आले आहे.

वारिस पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंग अजनाला कांडच्या घटनेनंतर फरार झाला होता. अमृतपाल सिंग हा खलिस्तानचा समर्थक आहे. अमृतपाल सिंगने मोगाच्या रोडा गावात आत्मसमर्पण केले. त्याचा साथीदार पापलप्रीत सिंग याला आधीच अटक करण्यात आली होती, तेव्हापासून अमृतपाल सिंगला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर 36 दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंगला अटक करण्यात आली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पंजाब पोलिसांनी अमृतपालला अटक केली आहे. अमृतपालची आसाममधील दिब्रुगड तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. खलिस्तान समर्थकावर पोलिसांनी आधीच कडक कारवाई केली आहे. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि लोकसेवकांच्या कामात अडथळा निर्माण करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

नवले पुलानजीक ट्रक – ट्रॅव्हल्सची धडक तिघांचा मृत्यू

36 दिवसांपासून फरार होता
पंजाब पोलीस 18 मार्च रोजी फरार झाला होता. त्याच्या शोधात अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, 23 फेब्रुवारी रोजी अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांनी सहकारी लवप्रीत तुफानच्या सुटकेची मागणी करत अजनाळा पोलिस स्टेशनवर शस्त्रांसह धडक दिली होती. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले.

भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर; जाणून घ्या पावसाचा अंदाज

अमृतपालची पत्नी किरणदीप कौर पोलिसांच्या ताब्यात
अमृतपालला अटक करण्यापूर्वी त्याची पत्नी किरणदीप कौर हिला पोलिसांनी शुक्रवारीच ताब्यात घेतले होते. किरणदीप कौरला अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. किरणदीप एअर इंडियाच्या विमानाने बर्मिंगहॅमला जाणार होती. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला प्रवास करू दिला नाही आणि ताब्यात घेतले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube