नवले पुलानजीक ट्रक – ट्रॅव्हल्सची धडक तिघांचा मृत्यू

Untitled Design   2023 04 22T090117.159

Pune Banglore Highway Accident : पुणे-बेंगलोर महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याच्या समोर आले आहे. एक ट्रक आणि खासगी बसमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ ही घटना घडली आहे. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच या अपघात स्थळी रेस्क्यू टीम दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात (Pune Accident) जखमी अवस्थेत असलेल्या एकूण १८ प्रवाशांना पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, एक खासगी ट्रॅव्हल बस साताऱ्याहून मुंबईकडे जात होती. यावेळी एका ट्रकने या बसला पाठीमागून जोराची धडक (Bus Accident) दिल्याने हा अपघात झाला. ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Accident News) झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा देखील मृत्यू झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube