भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर; जाणून घ्या पावसाचा अंदाज

भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर; जाणून घ्या पावसाचा अंदाज

Bhendwal Prediction : पाऊस – पाणी चांगले राहिले तर शेतात पीक देखील चांगली येतात. यासाठी बळीराजा पावसाच्या आगमनाची वाट पाहत असतो. यातच यंदाच्या वर्षाला पावसाची काय परिस्थती असणार याची देखील शेतकऱ्यांना चिंता असते. यातच राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेला बुलढाण्यातील ‘भेंडवळची घटमांडणी’चे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे. राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. या भविष्यवाणीने बळीराजाच्या चिंतेत भर घातली आहे.

भेंडवळमधील घटमांडणीची प्रक्रिया नेमकी आहे तरी काय?
एका शेतात खड्डा खोदला जातो. या खड्ड्यात मातीचा घट ठेवण्यात येतो व त्याघटात पाणी भरले जात. त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारची धान्य, अशा या ‘घट मांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की, 350 वर्षांपासून अक्षयतृतीयेला ही प्रथा जोपासली जाते.

यंदाच्या घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. दरम्यान आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील वर्षभराचे घटात झालेल्या बदलावरुन वर्षभराचं नियोजन आणि अंदाज वर्तवण्यात आले. राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

पावसाबाबत काय अंदाज आहे? जाणून घ्या
यंदाच्या वर्षी जून महिन्यात कमी पाऊस पडणार असल्याने पेरणी उशिरा होईल. तर जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी देखील होईल. तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल. याबरोबरच अवकाळी पाऊस भरपूर होणार असून, पिकांचे नुकसान होईल

नवले पुलानजीक ट्रक – ट्रॅव्हल्सची धडक तिघांचा मृत्यू

पीक पाण्यासंबंधीचे अंदाज जाणून घ्या
शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. यावर्षी पिकांवर रोगराई राहिल. कापूस पीक मध्यम होईल मात्र कापसात तेजी असणार आहे. तर ज्वारी, मूग पीक, उडीद, तीळ सर्वसाधारण राहिल, तूर पीक चांगले असेल. बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल. तांदुळाचं चांगलं पीक येईल, गहू सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहिल हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल. मात्र नुकसान सुद्धा होईल

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube