राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान सुरु; पाटील-महाडिकांची प्रतिष्ठा पणाला

राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान सुरु; पाटील-महाडिकांची प्रतिष्ठा पणाला

Voting for Rajaram Sugar Factory begins : कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणुकीवरून महाडिक व पाटील यांच्यामध्ये चांगलीच जुंपली देखील होती. प्रतिष्टेची बनलेल्या या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रकियेसाठी सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून जिल्ह्यातील एकूण 58 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान केंद्र परिसरात 144 कलम लावण्यात आले आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि. २३) सकाळी आठ वाजेपासून मतदानदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यातील 58 मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू झाले आहे. दरम्यान सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या असल्याचे चित्र दिसले. गावागावांतील केंद्रांवर गटनेते, उमेदवार, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

निवडणुकीवरून दोन नेते शाब्दिक भिडले
कोल्हापुरात श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान ही निवडणूक आमदार सतेज पाटील व अमल महाडिक यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. महाडिकांचा पराभव करण्यासाठी सतेज पाटलांनी देखील चांगलंच चंग बांधला आहे. तर दुसरीकडे महाडिक यांनी देखील जोरदार प्रचार करत आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे.

36 दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात

गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सतेज पाटील आणि महाडिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार आणि सभा घेत वैयक्तिक पातळीवर टीका करण्यात आली आहे. दरम्यान आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान विजयाचा गुलाल कोण उधळणार व जनतेचा कौल कोणाला असणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच.

भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर; जाणून घ्या पावसाचा अंदाज

पोलीस बंदोबस्त तैनात
मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 580 कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. तसेच एका केंद्रावर दहा अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मतदान केंद्र परिसरात जमावबंदी आदेश देखील लागू करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube