प्रत्युत्तर सभेतून नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत छाती ठोकून देणार असल्याचं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी शरद पवारांविरोधात(Sharad Pawar) आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आले आहेत. शरद पवारांच्या स्वाभिमान सभेनंतर 27 तारखेला बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची सभा पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात मुंडे बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले, स्वाभिमान सभेत कोण काय बोललंय त्याला उत्तर नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत छाती ठोकूनच उत्तर देणार असल्याचा इशाराच मुंडे यांनी शरद पवारांनी दिला आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर शरद पवार यांची पहिलीच स्वाभिमान सभा बीडमध्ये झाली. या सभेत शरद पवारांनी तुम्ही माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं काय बघितलं? या शब्दांत धनंजय मुंडे यांना खडेबोल सुनावले होते. त्यानंतर देवाने भक्ताला मनातून काढून टाकले तर भक्ताच्या मनातला देव निघत नाही, या शब्दांत मुंडेंनी सारवासारव केली होती.
Happy Bhag Jayegi: आनंद एल राय यांच्या रोम-कॉम ‘हॅपी भाग जायगी’ ची 7 वर्ष !
शरद पवारांनी केलेल्या टीकेवरुन धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर अधिक बोलणं टाळल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता आगामी सभेसाठी घेण्यात येणाऱ्या मेळाव्यांमध्ये मुंडे थेट इशाराच देत असल्याचं दिसून येत आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, येत्या 27 तारखेची सभा फिक्स झाली आहे. 27 तारखेच्या सभेवर अनेक मान्यवरांसह माध्यमांचही लक्ष असणार आहे. त्यामुळे 27 तारखेला सभा रेकॉर्डब्रेक होणार असल्याचा दावाही मुंडे यांनी केला आहे.
चिकुनगुनियापासून होऊ शकते सुटका, लस विकसित करण्याच्या दिशेने एक पाऊल
तसेच हा मेळावाच एवढा मोठा आता सभा किती मोठी होणार आहे याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. सभेसाठी बीडमधील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन या, असं आवाहन धनंजय मुंडे यांन यावेळी केलं आहे. यासोबतच बीड जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचीही घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. सप्टेंबर महिन्यात पहिल्याच आठवड्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिलीयं.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये सभा घेत विरोधकांवर जोरदार टीका केलीयं. याच सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाकडूनही कंबर कसली असल्याचं दिसून येतंय. ज्या ठिकाणी शरद पवारांनी पहिली स्वाभिमान सभा घेतील त्याचं ठिकाणी अजित पवार गटाची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत अजित पवारांसह धनंजय मुंडे काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.