Narayana Murthy Birthday : एका जिद्दीनं करुन दाखवलं! पत्नीकडून 10 हजार उसणे घेऊन नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य

Narayana Murthy Birthday : एका जिद्दीनं करुन दाखवलं! पत्नीकडून 10 हजार उसणे घेऊन नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य

Happy Birthday N Narayana Murthy: बऱ्याचदा अपयश येऊनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इन्फोसिसचे साम्राज्य उभे करणाऱ्या नारायण मूर्ती यांचा आज वाढदिवस. इन्फोसिस आणि त्याचे प्रमुख एन आर नारायण मूर्ती (N Narayana Murthy) यांचं नाव जगभरात प्रचलित आहे. जभभरातील विविध उद्योग आणि उद्योजकांमध्ये नारायण मूर्ती यांचे नाव आदराने घेतले जाते. एखादी गोष्ट ठरवली की ती कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्णच करुन दाखवायची. असेच त्यांनी मनाशी ठरवले आणि फक्त 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून इन्फोसिसचे मोठे साम्राज्य उभे करुन दाखवले. त्याच एन. आर. नारायण मूर्ती यांचा आज वाढदिवस.

शरद पवार अन् अजितदादा कशासाठी भेटले? संजय राऊतांनी ‘रोखठोक’मधून सांगितलं कारण

एन. आर. नारायण मूर्ती यांचं नाव देशासह जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांची इन्फोसिस कंपनी जगभरामध्ये व्यवहार करत असून लाखो लोकांना रोजगारही मिळवून देत आहे. एखाद्याने अतिशय जिद्दीने काही करायचं ठरवलं, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हे वाक्य देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांना तंतोतंत लागू होते. अतिशय साधेपणाने जीवन जगणाऱ्या नारायण मूर्ती यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचं नशीब बदललं आणि आज ते अनेकांसाठी प्रेरणा बनले आहेत. त्यांच्या या यशामागे मोठा संघर्ष देखील आहे.

Mahadev Jankar : जानकरांना ‘चूक’ उमगली, भाजपला बाजूला ठेवत आखला नवा प्लॅन!

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांचा जन्म 20 ऑगस्ट 1946 मध्ये कर्नाटकमधील सिद्लाघत्तामध्ये झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले नारायण मूर्ती त्यांच्या आठ भावंडांमध्ये पाचव्या क्रमांकावर होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 1967 मध्ये नॅशनल इन्स्टिस्टूट ऑफ इंजिनिअरिंग, मैसूर युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर 1969 मध्ये आयआयटी कानपूरमधून एमटेक केले. त्यानंतर त्यांनी 1970 च्या अखेरीस पुण्याच्या पाटनी कंप्युटर्समध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरीला सुरुवात केली.

एन. आर नारायण मूर्ती यांचा विवाह सुधा मूर्ती यांच्यासोबत 10 फेब्रुवारी 1978 रोजी झाला. लग्नानंतर त्यांच्या जीवनामध्ये मोठे बदल होण्यास सुरुवात झाली. लग्नानंतर त्यांनी आपली कंपनी सुरु करण्याचा विचार केला आणि जिद्दही ठेवली. त्यांनी सुरुवातीला सॉफ्टरोनिक्स नावाने कंपनी सुरु केली, मात्र यशस्वी झाली नाही. त्यानंतरही नारायण मूर्ती आपल्या जिद्दीवर अडून राहिले. याच जिद्दीतून आणि मेहनतीतून त्यांनी सर्वात मोठी कंपनी उभारल्याचे पाहायला मिळत आहे.

मूर्ती यांनी 1981 मध्ये आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत आपली कंपनी सुरु करण्याचे योजना आखली. त्यावेळी मूर्ती आपल्या पत्नी सुधा यांच्यासोबत एका खोलीमध्ये राहात होते. कंपनीचे नाव इन्फोसिस असे ठरवण्यात आले. या कंपनीमध्ये आपला हिस्सा देण्यासाठी मू्र्ती यांनी त्यांच्या पत्नी सूधा मूर्तींकडून 10 हजार रुपये उसणे घेतले. त्यानंतर पुण्यातील एका अपार्टमेंटमध्ये इन्फोसिसची सुरुवात झाली. 1983 मध्ये कंपनीचचे मुख्यालय पुण्यातून बंगळूरुमध्ये हलवण्यात आले.

आता सध्या इन्फोसिस अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेकविध देशांमध्ये काम करत आहे. 1981 पासून 2002 पर्यंत नारायण मूर्ती कंपनीचे सीईओ होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने गरुडझेप घेतली आणि कंपनी बघता बघता जगभरातील मोठ्या कंपन्यांच्या बरोबरीला जाऊन पोहोचली. 1991 मध्ये इन्फोसिस पब्लिक लिमिटेड कंपनीत बदलली आणि 1999 मध्ये याचे शेअर्स अमेरिकी स्टॉक मार्केट NASDAQ मध्ये लिस्ट झाले. सध्या इन्फोसिस मार्केट कॅपच्या हिशोबाने देशाती टॉप 10 कंपन्यांमध्ये आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube