Download App

अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचे पिल्लू, गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान

Gopichand Padalkar on Ajit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे पवार कुटुंबावर राजकीय टीका करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर पडळकरांकडून टीका केली जाणार नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण आज टीव्ही9 शी बोलताना गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना लबाड लांडग्याचे पिल्लू म्हटले आहे.

राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. यावरुन गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्ष लिहिलं आहे. पण अजित पवारांना पत्र लिहिले नाही. याबद्दल त्यांना विचारल्यावर पडळकरांनी अजित पवारांसह सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केली.

स्वातंत्र्याच्या चळवळीचा साक्षीदार ‘इंडिया क्लब’ होणार बंद, ‘शशी थरूर कुटुंबाचे आहे खास नाते’

गोपीचंद पाडळकर म्हणाले की धनगर समाजाबद्दल शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे ओठात एक आणि पोटात एक आसते. सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे. अजित पवार यांच्याकडून आम्हाला काही न्याय मिळू शकत नाही. अजित पवार हे म्हणजे लबाड लांडग्याचे पिल्लू आहे.

नार्वेकर अन् शिंदे गट बॅकफूटवर; ठाकरे गटाला दिलासा : सर्वोच्च न्यायालयात काय काय घडलं?

अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडू आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना फडणवीस यांना पत्र दिलं आहे, असे पडळकरांनी सांगितले.

रोहित पवारला माहित नाही, शरद पवार सारखे 500 लोक भाजपमध्ये आहेत. ते एक पिल्लू आहे. हे कुठल्या कोपट्यात बसेल हे कळणार नाही,अशी टीका रोहित पवार यांच्यावर केली.

Tags

follow us