Download App

राणांचा दावा, सावंताची वॉर्निंग : भाजप-शिंदेंच्या सुखी संसारात ‘धारशिव’मध्ये मिठाचा खडा

Tanaji Sawant vs Rana Jagsingh Patil :  लोकसभा निवडणुकीला आता फक्त एक वर्ष बाकी राहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन वादावादी सुरु झाल्याचे काहीसे चित्र दिसून येत आहे. अशातच आता भाजप व शिवसेनेमध्ये देखील काही जागांवरुन अशीच स्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुळ शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. यावेळी त्यांच्यासोबत 40 आमदार देखील आले. यानंतर 13 खासदारही एकनाथ शिंदेच्या सोबत आले.

त्यामुळे आता भाजप व शिवसेना यांच्यात जागा वाटपावरुन ठिणगी पडल्याचे दिसत आहे. याला निमित्त ठरले आहे, धाराशिव लोकसभेच्या जागेचे. भाजपचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी 2024 साली धाराशिव येथून भाजपचा खासदार निवडून येईल, असे वक्तव्य केले. यानंतर शिवसेनेचे मंत्री डॉ. तानाजी सावंत हे चांगलेच आक्रमक झाले आहे. आम्हाला कोणीही टेक इट ग्रँटेड धरु नये, असे म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे.

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचा अहमदनगरमध्ये होणारा वर्धापन दिन रद्द : अजित पवार यांची घोषणा

धारशिवची लोकसभेची जागा ही शिवसेनेचीच आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनाच लढेल. यामुळे कोणेतही वादंग अथवा मतमतांतर असण्याचे कारण नाही, असे सावंत म्हणाले. भाजपने या जागेवर का दावा केला ते माहिती नाही. पण जर आम्हाला कोणी टेक इट ग्रँटेड धरत असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही. आमचं अस्तित्व वेगळं आहे, आमचा गट वेगळा आहे, आमची शिवसेना आहे. ही जागा गेल्या 25-30 वर्षांपासून शिवसेनाच लढत आहे, त्यामुळे 2024 साली देखील ही जागा शिवसेनाच लढवेल, असे असे सावंत म्हणाले.

Cabinet Expansion : ‘जो साब देगा वो हम लेगा’ : गोगावलेंचं मंत्रीपद कन्फर्म!

दरम्यान,  राणा जगजितसिंह पाटील यांनी 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. यानंतर विधानभा निवडणुकीच्यावेळी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटात आहेत. त्यामुळे धाराशिव या जागेवर भाजप व शिवसेना या दोघांकडून दावा सांगण्यात येत आहे.

follow us