धर्मेंद्र प्रधानांच्या मुलीचाच देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही?’; राज ठाकरेंचा थेट सवाल

राज ठाकरेंनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीच्या परदेशातील शिक्षणाचा उल्लेख

Raj Thackeray शिव्या देण्याचा अधिकार काय भाजपाला आहे का?

Raj Thackeray शिव्या देण्याचा अधिकार काय भाजपाला आहे का?

Dharmendra Pradhan daughter studies abroad, Raj Thackeray question education system: नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी देशातील शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येवरून सरकारला धारेवर धरले.

कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले ; राज ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप

यावेळी माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या मुलीचा उल्लेख करत राज ठाकरेंनी सरकारला थेट सवाल केला. “धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी परदेशात शिकते. जर प्रधानांच्या मुलीचा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसेल, तर बाकीच्या मुलांचं काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय घ्यावा लागेल’ प्रशांत किशोरांचा सुनेत्रा पवारांना स्पष्ट इशारा; तटकरेंवर नाराजी?

राज ठाकरे म्हणाले की, देशातील विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. मात्र, त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. दरवर्षी विद्यार्थ्यांकडून आंदोलनं होत आहेत. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष होत राहिल्यास विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढत जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिडू नये, शिव्या देऊ नये असं जर सरकार म्हणत असेल तर शिव्या देण्याचा अधिकार काय भाजपाला आहे का? असा सवालही त्यांनी केला. तसेच नीट ही फक्त सरुवात आहे आता बघा काय होतंय, असा इशाराही राज ठाकरेंनी केला.

कुणी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित वेगळा निर्णय…अॅड. असीम सरोदे यांना वेगळीच शंका

देशातील अनेक पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवत आहेत. यामागे केवळ विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षा नसून देशातील शिक्षण व्यवस्थेबाबत निर्माण झालेला विश्वासाचा प्रश्नही आहे, असे राज ठाकरे यांनी सूचित केले.

“मुलं काय म्हणत आहेत, हे आपण समजून घेणार आहोत का? त्यांच्या आई-वडिलांना काय त्रास होतोय, हे समजून घेणार आहोत का?”, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या शिक्षणविषयक धोरणांवर टीका केली.

कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; 11 जणांवर जबाबदारी

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी सरकारला घेरले. शिक्षण व्यवस्थेत खासगी क्लासेसचा वाढता प्रभाव, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रश्नांवर सरकारने तज्ज्ञांशी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, “धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीचा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसेल तर इतर विद्यार्थ्यांनी या व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा?” या राज ठाकरेंच्या सवालामुळे नीट पेपरफुटीच्या मुद्द्याला आता शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाच्या प्रश्नाचीही जोड मिळाली आहे.

Exit mobile version