Amravati Election : आमदार लिंगाडे यांनी केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा विजय झाला. दरम्यान या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लिगांडे यांनी एक मोठा गौफ्यस्फोट केला आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात मतमोजणी होत असताना संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव होता. येथील निकाल फिरवण्यासाठी वरून खोक्यांची खूप मोठी ऑफर देण्यात आली होती, असं […]

Untitled Design (25)

Untitled Design (25)

अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा विजय झाला. दरम्यान या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लिगांडे यांनी एक मोठा गौफ्यस्फोट केला आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात मतमोजणी होत असताना संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव होता. येथील निकाल फिरवण्यासाठी वरून खोक्यांची खूप मोठी ऑफर देण्यात आली होती, असं लिगांडे यांनी म्हंटले आहे.
Sujay Vikhe Patil : भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची | LetsUpp Marathi
अमरावती मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (amravati graduate constituency result) मतमोजणीला 24 तास झाल्यानंतर विरोधी उमेदवार रणजित पाटलांकडून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी देखील हो म्हणत सहमती दर्शवली. त्यामुळे निकाल दुसऱ्या दिवशीपर्यंत लांबला.

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत काँग्रेसचे (Congress) धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) विजयी झाले. या विजयानंतर लिंगाडे यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे.

यावेळी बोलताना लिगांडे म्हणाले, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात मतमोजणी होत असताना संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव होता. येथील निकाल फिरवण्यासाठी वरून खोक्यांची खूप मोठी ऑफर देण्यात आली होती.

नाना पटोलेंनी याची माहिती आम्हाला दिली आणि मतमोजणी टेबल सोडून कुठेही जाऊ नका, असा आदेश दिला. त्यामुळे संपूर्ण मतमोजणी होईपर्यंत आम्ही तिथेच होतो. यावेळी बोलताना धीरज लिंगाडे यांनी भाजपने अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर दिली होती, असा दावा केलाय.

यावेळी माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे हे उपस्थित होते. त्याचबरोबर व्यासपीठावर जिल्ह्यातील आघाडीचे नेते, पदाधिकारी बहुसंख्येने हजर होते. यावेळी लिंगाडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Exit mobile version