दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचला? माजी पीएच्या आरोपाने खळबळ

अहमदनगर : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. शिंदे म्हणाले, भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांची भेट घेऊन मनसे प्रमुख राज […]

Fsdfs

Fsdfs

अहमदनगर : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत.

शिंदे म्हणाले, भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांची भेट घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट दीपाली सय्यद होता अयोध्या दौऱ्यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद प्रोत्साहित करत होत्या, यासाठी त्यांना एका मोठ्या नेत्याचा पाठिंबा होता,

यासाठी सय्यद यांनी जवळपास 17 ते 18 वेळी दिल्लीची वारी केल्याचं भाऊसाहेब शिंदे यांनी सांगितलं. यासंदर्भात मी बाळा नांदगावकरांना याबाबत मी सांगितलं होतं. त्यांनी भेट घेण्यास मला बोलवलं, पण काही कारणास्तव माझी त्यांच्याशी भेट होऊ शकली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला यांच्यासोबत सय्यद यांचे आर्थिक संबंध आहेत. त्या अनेक वेळा दुबईला जातात. त्यांची चौकशी केली तर, त्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे.

यावेळी सर्व पुरावे माझ्याकडे असून मला संरक्षण द्या,मी राज्य शासन आणि पोलिसांना पुरावे देऊ शकतो, असा दावाही शिंदे यांनी केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत कोविड योद्धा पुरस्कार प्रदान सोहळा झाला.

हा कार्यक्रम सय्यद यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आला होता. त्यावेळी सर्व कोविड योध्यांना ५० हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले होते. मात्र हे धनादेश खोटे असून ५० लोकांना दिलेल्या धनादेशापैकी एकही धनादेश बँकेत वटणार नाही. दीपाली सय्यद आणि राज्यपालांनी कोविड योद्ध्यांची फसवणूक केली आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.

Exit mobile version