Devendra Fadnavis : फडणविसांना अटक करायचा प्लॅन हाेता? वळसे पाटलांनी मनातल सांगितलं…

जालना ः मुंबई महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर खोट्या केसेस टाकून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा काेणताही डाव नव्हता. फडणवीस यांना काय माहिती मिळाली त्यावरून ते बोलले असतील. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडलेले नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले आहे. महाविकास आघाडीचे शिक्षक […]

Dilip Walse

Dilip Walse

जालना ः मुंबई महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर खोट्या केसेस टाकून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा काेणताही डाव नव्हता. फडणवीस यांना काय माहिती मिळाली त्यावरून ते बोलले असतील. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडलेले नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले आहे.

महाविकास आघाडीचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित शिक्षक सहविचार सभेच्या निमित्ताने ते जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या काळात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मला टार्गेट करण्याची सुपारी दिली होती असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर केला. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी येथे स्पष्टीकरण दिले.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडलेले नाही. त्यांना काय माहिती मिळाली आहे त्यावरून ते बोलले असतील. तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे प्रकार चांगले माहिती आहे. ज्या प्रकारे ईडी, सीबीआय कॉन्ट्रॅक्ट घेऊन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाया करतात. त्यामुळे हे प्रकार त्यांना माहिती आहे, अशी टीका राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

Exit mobile version