Download App

दिशा सालियनच्या अंत्यविधीचे फोटो व्हायरल, शरिरावर कफन पण हत्या की, आत्महत्या?; चेहरा काय सांगतो?

Disha Salian Death Case : तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) आरोप- प्रत्यारोप सुरु झाले.

  • Written By: Last Updated:

Disha Salian Death Case : तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. या प्रकरणावरुन आता ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले आहे. यातच आता बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian) अंत्यविधीवेळचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहे.

दिशा सालियनचा 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता मात्र आता अंत्यविधीचे फोटो दुसरचं काही सांगत असल्याचा दावा दिशा सालियनच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप दिशा सालियनच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता मात्र गेल्या पाच वर्षात दिशा सालियनचा एकही फोटो समोर आला नव्हता. मात्र आता अंत्यविधी होतानाचे दोन फोटो समोर आले आहे आणि या फोटोमध्ये दिशाचा चेहरा स्पष्टपणे दिसत असल्याने कुटूंबियांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

हायकोर्टात याचिका

तर दुसरीकडे दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह 3 ते 4 अभिनेत्यांचे नाव घेण्यात आले आहे. याचबरोबर याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरीही याचिकेत दिशाभूल केल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे.

पक्ष मोदींची निवृत्ती स्वीकारणार?; पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या मोदींसाठी फडणवीसांचा मास्टर प्लॅन

दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. मात्र ही आत्महत्या होती की हत्या होती, यावरून अनेक दावे करण्यात येत आहे. व्हायरल फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे आणि तिच्या शरीरावर कफन आहे. पण तिचा चेहरा उघडा आहे. तिच्या चेहऱ्यावर कुठलीही इजा झालेले नाही असं व्हायरल फोटोमध्ये दिसत आहे.

follow us