पक्ष मोदींची निवृत्ती स्वीकारणार?; पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या मोदींसाठी फडणवीसांचा मास्टर प्लॅन

पक्ष मोदींची निवृत्ती स्वीकारणार?; पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या मोदींसाठी फडणवीसांचा मास्टर प्लॅन

 Devendra Fadnavis On PM Modi  : सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधक संतोष देशमुख हत्या प्रकरण, लाडकी बहिण योजना आणि राज्यात सुरु असणाऱ्या इतर मुद्यांवर सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे नागपूर हिंसाचारावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर देखील जोरदार टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. यातच लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना 2029 मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी यावेळी मला दिल्लीच्या राजकारणात रस नसल्याचीही माहिती दिली.

लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखात घेतली.  या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी राज्यातील विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली तसेच त्यांनी यावेळी 2029 ला नरेंद्र मोदीच (PM Modi) पंतप्रधान होणार असा विश्वास देखील व्यक्त केला.

नरेंद्र मोदी यांचे 75 वर्षपूर्ण होणार आहे. नरेंद्र मोदी , अमित शाह (Amit Shah) , योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस या सगळ्यात आपल्याला कुठे पाहतात? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता.

या प्रश्नावर उत्तर देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमच्या पक्षात 75 वर्षांची सीमा नरेंद्र मोदी यांनी ठरवलेली असली तरीही ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही. मोदी जी फिजिकली फिट आहे. आता जागतिक स्थळावर त्यांनी भारताला नेतृत्व दिला आहे. त्यामुळे 2029 साली देखील मोदीजी  पंतप्रधान व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही ती लादण्याचा प्रयत्न करू. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीस पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की त्याला कुठे टाका तो तिथे फिट आहे. आजतरी पक्षाने मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जबाबदारी उत्तमपणे पार पडण्याचा प्रयत्न मी करेल. मला माझ्या क्षमता आणि मर्यादा माहिती आहे. त्याच्यामुळे मी दिल्लीकडे डोळे लावून बसलो नाही.

प्रेम, लग्न अन् विश्वासघात…, पत्नीनेच काढला पतीचा ‘काटा’, सौरभ राजपूत हत्याकांडात धक्कादायक खुलासा

मी मुंबईमध्ये अतिक्षय खुश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचा वातावरण उत्तम आहे आणि मुंबईत तुमच्या सारखे मित्र आहे ते दिल्लीमध्ये नाही. त्याच्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube