Sudhir Mungantiwar : मला व्यक्तीवर आधारित पक्ष आणि राजकारण आवडत नाहीतर देशसेवा करणारा पक्ष आणि राजकारण आवडतो, असं म्हणत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आधीच्या वक्तव्यावर यूटर्न घेतला आहे. दरम्यान, तुम्हाला शिंदेसोबतची भाजप की पवारांसोबतची भाजप आवडते? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, त्यावर मुनगंटीवार म्हणाले, मला शिंदेंसोबतची भाजपा आवडत नाही आणि अजित पवारांसोबतचीही भाजपा आवडत नाही. मला भाजपा हा देशाची सेवा करणारा पक्ष आवडत असल्याचं विधान मुनगंटीवारांनी केलं होतं.
Ahmednagar Crime : महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच तहसीलदारांना मारहाण; महसूल कर्मचारी आक्रमक
पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मीसुद्धा ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम’चा विद्यार्थी राहिलेलो आहे आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो आहे. माझे ते वक्तव्य तुम्ही ट्विस्ट करू नका. ‘मला अजितदादांसोबतचे भाजपसुद्धा आवडत नाही. मला देशाची सेवा करणारं भाजप आवडतं’ याचा अर्थ मला व्यक्तीवर आधारित पक्ष आणि राजकारण आवडत नाही. तर देशसेवा करणारा पक्ष आणि राजकारण आवडतो, असं त्यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे.
Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स अन् अॅक्शन सीन्स; किंग खानचा धमाकेदार ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित
‘इंडिया’ बैठकीवर टीका :
इंडियाच्या बैठकीवरुन भाजपमध्ये कुठेही अस्वस्थता नाहीये. माझ्याकडे बघा, माझ्या बाजूला अतुल सावे बसले आहेत. कुणाच्याही चेहऱ्यावर तुम्हाला अस्वस्थता, दिसते आहे का? त्यांच्या नेतृत्वामध्ये देशाचे कधीही कल्याण होऊ शकणार नाही. कारण ते केवळ आणि केवळ पारिवारिक राजकारण करत आहेत.
Photos : पहिल्या मंगळागौरीची हौस; पारंपारिक लूकमध्ये राणादा-पाठकबाई
बाप मुख्यमंत्री, पोरगा पर्यावरण मंत्री, मामा सिंचनमंत्री तर भाचा ऊर्जामंत्री. असे राजकारण केल्याने देश कधीही पुढे जाणार नाही. अमेरिकेत जाऊन भारताची निंदा करणे. भारत मातेचा मृत्यू झाला, असे म्हणणे आम्ही ऐकू शकत नाही. आमचं राजकारण सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी नाही.१५-१५ वर्ष विरोधात राहिलो, पण कधी सत्तेचा मोह नाही केला, असेही ते म्हणाले.
दरम्यान, तुम्हाला शिंदेसोबतची भाजपा आवडते का पवारांसोबतची? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी मला शिंदे-पवारांसोबतची भाजपा आवडत नसल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांनी युटर्न घेतल्याचं दिसून आलं आहे.