Photos : पहिल्या मंगळागौरीची हौस; पारंपारिक लूकमध्ये राणादा-पाठकबाई

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालितून प्रसिद्ध झालेली जोडी म्हणजे राणा आणि अंजली म्हणजेच राणादा आणि पाठकबाई.

तर खऱ्या आयुष्यात त्यांची नाव हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आहेत.

मालिकेत त्यांची जोडी प्रसिद्ध झाली तशी रिअल लाईफमध्ये देखील ते एकमेकांचे लाईफ पार्टनर आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच विवाह केला आहे.

आता या नवविवाहित जोडप्याने त्यांची पहिलं मंगळागौर पूजन केलं आहे. याचे खास फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

या जोडप्याच्या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.
