Download App

मिरज शासकीय रुग्णालयात माणसांबरोबरच प्राण्यांवरही इलाज होतो का? रोहित पवारांचा आरोग्यमंत्री सावंतांना रोखठोक सवाल

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar : काल राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची एक जाहिरात एका राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. गरीब जनतेसाठी औषध खरेदी आणि ग्रामीण रुग्णालयांसाठी सरकारकडे निधी नाही. मात्र, आरोग्य खात्याच्या जाहिरातबाजीसाठी सरकार कोट्यावधींचा खर्च करतं, अशी टीका रोहित पवारांनी (Rohit Pawar)केली होती. अशाचत आता मिरज रुग्णालयातील (Miraj Government Hospital) फोटो शेअर करून या रुग्णालयात प्राण्यांचा पण इलाज होतो का? असा थेट सवाल त्यांनी केला.

काल महाराष्ट्र आरोग्य विभागाची एक जाहिरात वर्तमानपत्रात छापून आली होती. या जाहिरातीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पीएम नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटोही छापण्यात आले होते. यामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाने केलेली काम आणि सुरू केलेल्या योजनांची माहिती देण्यात आली होती. या जाहिरातीवर करण्यात आलेल्या खर्चावरून थेट रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये शासकीय रुग्णालयाचं काम ४० टक्के पूर्ण झालं. मात्र, पुढचा निधी दिला जात नसल्याने निधीअभावी काम ठप्प झालं. शासनाच्या दिरंगाईमुळं एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर शासन जबाबदारी घेईल का, असा सवाल केला होता. दरम्यान, आता मिरज रुग्णालयातील फोटो शेअर करून आरोग्यमंत्र्यांच्या कारभारावरच बोट ठेवलं.

Shantit Kranti 2: ‘तीन दोस्तांची धमाल मस्ती दाखवणारा ‘शांतीत क्रांती २’ चा ट्रेलर प्रदर्शित  

रोहित पवार यांनी ट्विट करत दोन फोटो शेअर केले. या फोटोमध्ये काही कुत्रे दवाखान्यातील बेडवर लोळतांना दिसत आहेत. रोहित पवारांनी लिहिलं की, एका कार्यकर्त्याने पाठवेला मिरज शासकीय रुग्णालयाचा हा फोटो आहे. येथे कदाचित माणसांबरोबरच पाळीव प्राण्यांचा पण उपचार केला जात असावा. ही अभिनव योजना कालच्या जाहिरातीमध्ये देण्यास आरोग्यमंत्री विसरले असावेत. या योजनेसाठी आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार नक्कीच प्राप्त होईल, शासनाने केवळ आरोग्यमंत्र्यांचे नामांकन करायला हवं, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

https://x.com/RRPSpeaks/status/1705108061709533245?s=20

रोहित पवार म्हणाले, स्वत:च्या प्रसिध्दीसाठी उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत, पण माझ्या मतदारसंघात 40% काम पूर्ण झालेल्या शासकीय दवाखान्यासाठी तसेच राज्यातल्या इतर भागात आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाकडे निधी पैसे नाहीत, अशा गलथान कारभाराला आता द राईस ऑफ हेल्थी महाराष्ट्र म्हणायचं का? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.

Tags

follow us