Shantit Kranti 2: ‘तीन दोस्तांची धमाल मस्ती दाखवणारा ‘शांतीत क्रांती २’ चा ट्रेलर प्रदर्शित 

Shantit Kranti 2: ‘तीन दोस्तांची धमाल मस्ती दाखवणारा ‘शांतीत क्रांती २’ चा ट्रेलर प्रदर्शित 

Shantit Kranti 2 Trailer Out: तीन मित्रांची धमाल कथा सांगणारी वेब सीरिज ‘शांतीत क्रांती’ (Shantit Kranti 2) ही वेब सीरिज (Web series) चाहत्यांना चांगलीच आवडली होती. (Trailer Out) अभय महाजन (Abhay Mahajan), ललित प्रभाकर आणि अलोक राजवाडे यांनी या तीन धमाल मित्रांची भूमिका साकारली होती. (Marathi Movie) अनेकांनी या सीरिजला आपली मोठी पसंती दर्शवली होती. परंतु या सीरिजचा दुसरा भाग नेमका कधी येणार याची सर्वजणच खूप आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत होते.

https://www.youtube.com/watch?v=pKSU6gHUeRE&t=127s

अखेर या सीरिजचा दुसरा भागाची घोषणा करण्यात आली आहे. ‘शांतीत क्रांती २’चा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्‍या सीझनला मिळालेल्‍या उत्तम प्रतिसादामुळे सोनी लिव्‍ह ‘शांतीत क्रांती’चा दुसरा सीझन सादर करण्‍यास सज्‍ज झाला आहे. या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन आणि हास्याचा दुहेरी डोस बघायला मिळणार आहे. ‘शांतीत क्रांती’च्या दुसऱ्या सीझनमध्ये १८ महिन्‍यांनंतर हे तीन जिगरी मित्र पुन्हा रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे.

या तिघांपैकी एक श्रेयस त्याच्या मित्रांना त्यानं लग्न करत असल्‍याची आनंदाची बातमी देत असतो. त्यानंतर तिघेही मित्र मिळून श्रेयसच्‍या इंटरनॅशनल बॅचलर ट्रिपवर जाण्‍याचे प्लॅन करतात. परंतु आता त्यांच्या बॅचलर ट्रिपच्या दरम्यान कथेत अनेक ट्वीस्ट होणार आहे. एकीकडे श्रेयसचा अजून साखरपुडा झाला नाही. तसेच प्रसन्‍न त्‍याच्‍या बाळाला सोबत आणतो. दिनारने बॅचलर ट्रिपऐवजी १० अनोळखी व्‍यक्‍तींसह नेपाळला ६ दिवसांच्‍या तीर्थयात्रेवर जातो. हे सर्व वेगवेगळे प्लॅन लक्षात आल्यानंतर नेमकी कथा कुठे वळण घेणार आहे. या सीरिजबद्दल बोलत असताना ललित प्रभाकरने सांगितले आहे की, ‘शांतीत क्रांती सीझन १ला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे.

Parineeti Raghav Wedding: परिणीती राघवच्या लग्नासाठी चोख बंदोबस्त; पाहुण्यांसाठी फोनवर…

आता आम्‍हाला नवीन सीझनसह पुनरागमन करत असताना आनंद होत आहे. यावेळी आम्ही हास्‍य, ट्विस्‍ट्स, रोमांच या सगळ्यांचा मिलाफ घेऊन येणार आहोत. आम्ही सर्वजण एका नव्या प्रवासाची सुरूवात करणार आहोत. तसेच या सीझनमध्ये काही नवीन पात्र देखील चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. हा सीझन देखील चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.’ या सीरिजचे दिग्‍दर्शन सारंग साठ्ये आणि  पॉला मॅकग्‍लीन यांनी केले आहे. या सीरिजमध्‍ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर हे तगडे कलाकार मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube