Ramdas Kadam On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला. जे शिवसेना प्रमुखांनी इतके वर्ष कमावलं होतं. ते तुम्ही मुख्यमंत्रीपद घेऊन सगळं गमावलं. असं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते आज रत्नागिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आयोजित केलेल्या आभार यात्रेत बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राला 25 वर्षापुढे नेले आहे. कोकण आजही शिवसेनेच्या ताब्यात आहे. बाळासाहेंबाचे विचार आज कोकणाच्या प्रत्येक घरात पोहोचले आहे आणि हे सर्व काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मात्र विचाराच्या माध्यमांतून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? त्यांनी नारायण राणे, मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील आणि झोपडपट्टीतून वर आलेल्याला रामदास कदमला शिवसेनेचा नेता केला पण उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला. जे शिवसेना प्रमुखांनी इतके वर्ष कमावलं ते तुम्ही मुख्यमंत्रीपद घेऊन सगळं गमावलं अशी टिका त्यांनी यावेळी केली. तसेच जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद घेतला नसता तर शिवसेना कधीच फुटली नसती असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती की, 40 आमदारांना जिंकू देणार नाही. बाप बेटे खोके खोके म्हणत होते मात्र जर रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांनी तोंड उघडले तर उद्धव ठाकरे यांना देश सोडून पळावं लागेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे 10-15 लोक राहिले आहेत, त्यातील एकही दोन वर्षात राहणार नाही. एक दिवस असा येईल की, तुम्हाला दोन वाजता हा देश सोडून लंडनला जावे लागेल. लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे. श्रीलंकेत तुमचे काय आहे आणि इतर ठिकाणी तुमचे काय काय आहे? हे आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा 50 वर्ष ‘मातोश्री’ वर काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. जर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही बोलला तर याद राखा, असा इशारही रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
माणिकराव कोकाटे सडेतोड बोलणारी व्यक्ती पण समर्थन करणार नाही, मंत्री विखेंनी भूमिका