Download App

अजित पवारांमुळं ‘आयाराम’ भाजप नेत्यांमध्ये चलबिचल!

  • Written By: Last Updated:

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : Due to Ajit Pawar, ‘Ayaram’ has become popular among BJP leaders! : सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राखून ठेवला, हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा निर्णय शिंदेगटासाठी प्रतिकूल असेल, असंही बोलल्या जातं आहे. त्यामुळं भाजपनंही आपल्या हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्या काही दिवसांपासून भाजपला अनुकूल अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळं अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अलिकडेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याचं बोलल्या जातं आहे. त्यामुळं अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे काही आमदारही जाणार असल्याचं बोलल्या जातं. राष्ट्रवादीच्या 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या सह्या अजित पवारांकडे दिल्याचं वृत्त आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या भाजपा प्रवेशाच्या शक्यतेने भाजप कार्यकर्ते धास्तवाले आहेत.

अजित पवार हे 40 आमदारांसोबद भाजपता जाणार असल्याचं वृत्त आहे. त्यानंतर अजित पवार यांनी आज सकाळपासूनच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर हटवले. खरंतर यापूर्वीही अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकून भाजपसोबत काही तासांचे सरकार स्थापन केले होते.
दरम्यान, आता अजित पवार हे पुन्हा भाजपात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळं ते नक्की काय निर्णय घेणार याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात अहेत. ही चर्चा अनेकांना पॉलिटिकल गॉसिप्स वाटतं असली, तरी भाजपाच्या काही नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली आहे.

समलैंगिक विवाहासंदर्भात संसद निर्णय घेणार, न्यायालयाने…

गेल्या काही वर्षात अजित पवार यांच्या दादागिरीला विरोध करत अनेकांनी भाजपची साथ दिली. त्यात, विशेषत: पुणे, पिंपरी चिंचवड आणि साताऱ्यासह पश्चिमम महाराष्ट्रामधील अनेक नेते भाजपत गेले आहेत. पुण्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील, राहुल कुल यांच्यात विस्तव जात नाही, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीच्या सरकारमध्ये तब्बल 15 वर्ष एकत्र काम केलं. मात्र, दोघांत राजकीय वैर आहे. पाटील यांचे कायम खच्चीकरण करण्यचा प्रयत्न अजित पवारांनी केला. पाटील याांच्या राजकारणाला पवारांनीच खऱ्या अर्थानं सुरूंग लावला. हर्षवर्धन पाटील निवडून येणार नाही, यासाठी अजित पवार यांनी चांगलीच मोर्चेबांधनी केल्याची चर्चा होती. घडलही तसंच, हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील काँग्रेस मधून भाजपात आले.

दुसरीकडे राहुल कुल यांच्या पत्नी कांचल कुल यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक थेट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढून पवारांशी पंगा घेतला होता. राहुल कुल यांच्या वडिलांपासून सुरु असलेल्या संघर्ष आतातर चांगलाच शिगेला पोहचला आहे. दुसरीकडे माढाचे खासदार असलेले रणजित निंबाळकर यांनी थेट शरद पवार यांच्यासोबत पंगा घेतला होता. जयकुमार गोरे यांच्या कुटुंबांनी थेट शरद पवार यांच्या सभेत गोंधळ घातला होता. त्यामागे रणजित निंबाळकर असल्याचे बोलले गेले. त्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्ती असताना बारामतीचे कालव्याचे पाणी कपात करुन रणजित निंबाळकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना मोठ आव्हान दिले होते. तत्कालिन जलसंपदा मंत्ती गिरीश महाजन यांनी हे पाणी कपात करुन पवारांना धक्का दिला होता.

पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेण्यात महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी मोलाची भूमिका बजावली होती. या दोन्ही आमदारांनी अजित पवार यांची दादागिरी कमी केली. त्यामुळं जगताप आणि लांडगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत बनले. महानगरपलिका, विधानसभा बरोबर अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या पराभवात लांडगे आणि जगताप यांचे योगदान मोठे होते. या कारणाने लांडगे आणि अजित दादा यांच्यात राजकिय संघर्ष पाहायला मिळाला आहे.

दरम्यान, आता अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे या सर्व नेत्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच घालमेल पाहायला मिळते. ज्यांच्या सोबत संघर्ष केला तेच अजित पवार पुन्हा आता आमचे नेते होणार असल्याच्या शक्यतेने आमची चांगलीच कोंडी होणार असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

 

Tags

follow us