Early morning swearing-in to teach Uddhav Thackeray a lesson, BJP leader’s big claim : 2019 मधील पहाटेच्या शपथविधीबाबत राज्यात वेळोवेळी विविध दावे करण्यात आले आहेत. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे शपथविधीच्या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil) यांनी सकाळी शपथविधी सोहळ्यामागे शरद पवारांचा हात असल्याचे म्हटले होते. त्यावेळी चर्चा चांगलीच रंगली होती. आता हा शपथविधी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धडा शिकवण्यासाठी होता असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले मुनगंटीवार?
भाजपसोबत युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे भाजपशी कसे वागले, हे सगळ्यांना ठाऊक आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी जनादेश झुगारला. त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली. पण नंतर फसवणूक केली. यामुळं पहाटेचा शपथविधी हे एक राजकीय ऑपरेशन होते. एक गमिनी कावा होता. उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला.
अजित पवार तयार झाले
अजित पवार यांनी भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याची तयारी केली होती. आम्हालाही उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता. कारण त्यांनी शिवसैनिकांचा अपमान केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवसैनिकांना सोडून ते स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार यांनी सोबत येण्याचे मान्य केले. याबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पाठीशी आहे, याचा विचार करूनच शपथ घेतली. अजित पवार सोबत आले तेव्हा अट नव्हती. ते उपमुख्यमंत्री होणार होते. त्यामुळेच सरकार आले, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातले मंत्री कमिशनखोर, खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपाने खळबळ
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे, भाजपने मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळला नाही, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेल्या शिवसेनेने म्हटले होते. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले नव्हते यावर भाजप नेते ठाम होते. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटाने शपथ घेतली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी पहाटे शपथविधी सोहळा पार पडला, असा खुलासा मुनगंटीवार यांनी केला. त्यामुळं आता शिवसेना यावर काय प्रत्युत्तर उत्तर देते हेच पाहणं महत्वाचं आहे.